एकाच दिवशी ३ दिग्गज क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली; रिटायरमेंट सामन्यात अश्रू अनावर, पाहा व्हिडिओ

New Zealand Player Retirement: आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ मधील न्यूझीलंडचा प्रवास अत्यंत निराशाजनक रीतीने संपुष्टात आला. लंडनच्या ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा नऊ गडी राखून धुव्वा उडवला.
New Zealand Player Retirement

New Zealand Player Retirement

ESakal

Updated on

महिला टी-२० विश्वचषकाच्या १०व्या आवृत्तीच्या 'ब' गटातील दोन उपांत्य फेरीतील संघ निश्चित झाले आहेत. शनिवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडकडून मानहानिकारक पराभव पत्करल्यामुळे गतविजेता न्यूझीलंड संघ आता स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या गटातून इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने अव्वल चारमध्ये स्थान मिळवले आहे. इंग्लंडकडून झालेल्या या पराभवामुळे न्यूझीलंडच्या तीन खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट झाला. सोफी डिव्हाईन, सुझी बेट्स आणि लीया ताहुहू यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com