New Zealand Announce Test Squad : वर्ल्ड कपमध्येच कसोटी संघाची अचानक घोषणा! संघाची धूरा 'या' खेळाडूच्या हाती तर...

New Zealand Announce Test Squad
New Zealand Announce Test Squad

New Zealand Announce 15-Member Squad For Bangladesh Tour : सध्या भारतात एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 खेळला जात आहे. यादरम्यान चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंडचा संघ 28 नोव्हेंबरपासून बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटने यासाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. संघात काही बदल करण्यात आले आहेत. संघाची धूरा टीम साऊदीच्या हाती असणार आहे. तर दोन वर्षांनंतर एका स्टार खेळाडूला कसोटी संघात संधी मिळाली आहे.

New Zealand Announce Test Squad
अँजेलो मॅथ्यूज 'टाईम आऊट' नव्हता, श्रीलंकेच्या खेळाडूने ICC ला दिला पुरावा अन् विचारला मोठा प्रश्न

स्टार फिरकी अष्टपैलू मिचेल सँटनरचे दोन वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. तो एजाज पटेल, ईश सोधी, रचिन रवींद्र आणि ग्लेन फिलिप्ससह फिरकी आक्रमणाची जबाबदारी सांभाळेल.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सँटनर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने 8 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. बांगलादेशच्या खेळपट्ट्या फिरकीला पोषक आहेत. याच कारणामुळे सँटनरला पुन्हा संधी मिळाली आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने न्यूझीलंडकडून शेवटची कसोटी इंग्लंडविरुद्ध खेळली होती.

New Zealand Announce Test Squad
ODI WC 2023 : सामना संपल्यानंतरही थांबला नाही राडा! श्रीलंकन खेळाडूंनी टाळले हस्तांदोलन अन्...

या पाच खेळाडूंना नाही मिळाली संधी

ग्लेन फिलिप्स देखील मार्च आणि एप्रिल 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळू शकला नाही. पण आता तो संघात परतला आहे. मायकेल ब्रेसवेल (जखमी), डग ब्रेसवेल, ब्लेअर टिकनर, नील वॅगनर आणि स्कॉट कुग्गेलीजन हे पाच खेळाडू आहेत ज्यांना मागील कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. न्यूझीलंड संघ बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी, दोन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड त्यांच्या दौऱ्याचा भाग असणार नाहीत.

बांगलादेश दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा कसोटी संघ :

टीम साऊदी (कर्णधार), केन विल्यमसन, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), डेव्हन कॉनवे, मॅट हेन्री, काइल जेमिसन, टॉम लॅथम (विकेटकीपर), डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, ईश सोधी , विल यंग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com