दोन्ही हाताने गोलंदाजी करणाऱ्या पोरानं क्रिकेटमधील 'गुलामगिरी'चं पितळ उघडं पाडलं

Nivethan Radhakrishnan bowling with both hands
Nivethan Radhakrishnan bowling with both handsesakal

आपण गल्लीत जरी खेळत असलो तरी ज्याची बॅट त्याला पहिल्यांदा बॅटिंग असते. तो जर रुसला फुगला तर पुढच्यांची बॅटिंग राम भरोसेच असते. त्यामुळे बॅटची मालकी असलेला पोराला जास्त बॅटिंग मिळते. कोणत्याही लहान मुलाला पहिले गिफ्ट हे क्रिकेट बॅटचेच मिळते. प्रत्येक क्रिकेट खेळणाऱ्या मुलाला सुरुवातीला रोहित शर्मा किंवा विराट कोहलीच व्हायचे असते.

Nivethan Radhakrishnan bowling with both hands
SA vs IND : टीका झाली माप, तरीही विराट भाऊची कॉलर ताठ

त्यामुळे बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग ही क्षेत्र मिळून क्रिकेट तयार होत असले तरी क्रिकेट हा फलंदाजांचाच (Cricket is a Batsmen Game) खेळ झालाय. त्याला कारणीभूत आहेत क्रिकेटचे नियम (Cricket Rules). या नियमानुसार गोलंदाजाला जवळपास गुलामासारखीच वागणूक मिळत आहे. फ्लॅट खेळपट्ट्या, आत येत चाललेल्या बाऊंडरी लाईन यामुळे मॉडर्न क्रिकेटमध्ये गोलंदाजांचे काम अवघड होत चालले आहेत त्यामुळे गोलंदाजांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी नानाविध शक्कल लढवाव्या लागतात.

ऑस्ट्रेलियाच्या भारतीय वंशाच्या फिरकीपटूने फलंदाजांना गोंधळात टाकणारी क्लुप्ती शोधून काढली. निवतन राधाकृष्णन (Nivethan Radhakrishnan) असं या अतरंगी गोलंदाजाचं नाव आहे. तो सध्या १९ वर्षाखालील वर्ल्डकमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करतोय. राधाकृष्णन हा उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी आणि डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स गोलंदाजी करण्यात माहिर आहे. (Nivethan Radhakrishnan bowling with both hands)

Nivethan Radhakrishnan bowling with both hands
Blog: विराट भावा सांभाळून नाहीतर तुझा स्टीव्ह स्मिथ होईल

आयसीसीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचा एक रील (ICC Instagram Reels) शेअर केला आहे. या रीलमध्ये राधाकृष्णन जे काही म्हणतोय ते क्रिकेट पंडितांनी मनावर घेण्याची गरज आहे. राधाकृष्णन म्हणतोय की जर एखादा फलंदाज अंपायरला न विचारताच स्विच हिट (Switch Hit) खेळू शकतो तर एखादा गोलंदाज अंपायरला न सांगता दुसऱ्या हाताने गोलंदाजी कराण्यात गैर काय आहे.

नियमानुसार गोलंदाज जर दुसऱ्या हाताने गोलंदाजी करणार असेल तर त्याला याची कल्पना आधी अंपायरला देणे बंधनकारक आहे. याच नियमावर राधाकृष्णनने बोट ठेवले. त्याने स्विच हिटचे उदाहरण देत क्रिकेटमधील दुजाभावच अखोरेखित केला आहे. आता क्रिकेटच्या नियमांचा ठेका घेतलेल्या मंडळींना या १९ वर्षाच्या पोराच्या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com