esakal | कॅरेबियन मुंबईकराला रोहित नव्हे चेन्नईचा कॅप्टन भारी वाटतो! | Top 5 Players In T20 Cricket
sakal

बोलून बातमी शोधा

Kieron Pollard Top 5 Players In T20 Cricket

कॅरेबियन मुंबईकराला रोहित नव्हे चेन्नईचा कॅप्टन भारी वाटतो!

sakal_logo
By
सुशांत जाधव

वेस्ट इंडीजच्या टी-20 संघाचा कर्णधार केरॉन पोलार्डने (Kieron Pollard) ने टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम पाच खेळाडूंची निवड केली आहे. (Top 5 Players In T20 Cricket) आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर पोलार्डने आपल्या पसंतीच्या खेळाडूंना या यादीत स्थान दिले आहे. आयसीसीने (ICC) अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन पोलार्डची निवड क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केलाय.

टी-20 वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यापूर्वी कॅरेबियन स्टारने 5 खास खेळाडूंची निवड केली आहे. त्याने निवडलेल्या टॉप 5 मध्ये वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे. यूनिवर्सल बॉस नावाने प्रसिद्ध असलेल्या गेलने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. सर्वाधिका धावांसर उत्तंग षटकार मारण्यातही तो नंबर वनला आहे.

हेही वाचा: SRH च्या 'चीअर बॉय'ला ऑस्ट्रेलिया तरी प्लेइंग 11 मध्ये घेणार?

पोलार्ड म्हणाला की, टी-20 क्रिकेटमध्ये गेलचे रेकॉर्ड त्याला माझ्या यादीत नंबर वनला नेऊन बसवण्यास पुरेसे आहे. गेलने 14 हजारहून अधिक धावा केल्या आहेत. यात 22 शतकांचा समावेश आहे. त्यामुळे टॉपरच असेल, असे पोलार्ड म्हणाला. दुसऱ्या क्रमांकावर त्याने श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाला स्थान दिले आहे. यॉर्कर किंगने टी-20 क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे माझ्या मते तोही टी-20 तील टॉप खेळाडू आहे, असे पोलार्ड म्हणालाय.

हेही वाचा: अशा खेळाडूला संघात घेतलंच कसं? गंभीरचा थेट निवड समितीला सवाल

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या पोलार्डने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या आपल्याच देशातील मिस्टर स्पिनर सुनील नारायणलाही बेस्ट टी-20 खेळाडूंच्या यादीत स्थान दिले आहे. टी-20 सामन्यातील पॉवर प्लेमध्ये त्याच्यासारखी उत्तम गोलंदाजी कोणी करेल, असे वाटत नाही, असे स्पष्टीकरण त्याची निवड करताना पोलार्डने दिले. टॉप 5 मध्ये त्याने एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश केला असून ते नाव भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे आहे. विकेटमागे उभे राहुन धोनी ज्यापद्धतीने रणनिती आखतो त्याला जगात तोड नाही, असे सांगत पाचव्या क्रमांकाला आपल्या नावाला पसंती दिली.

loading image
go to top