नो व्हॅक्सिन नो एन्ट्री; जोकोविच फ्रेंच ओपनलाही मुकणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Novak Djokovic

नो व्हॅक्सिन नो एन्ट्री; जोकोविच फ्रेंच ओपनलाही मुकणार?

पॅरिस : कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला मुकलेला टेनिस स्टार नोवाक जोकोविचला (Novak Djokovic) आता फ्रेंच सरकारनेही वॉर्निंग दिलीये. लस न घेतलेल्या कोणत्याही खेळाडूला फ्रेंच ओपनमध्ये (French Open) सहभाग घेता येणार नाही, असे फ्रेंच क्रीडा मंत्रालयाने (French Sports ministry) सोमवारी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेनंतर आता फ्रेंच ओपन स्पर्धेला मुकण्याची वेळ नोवाक जोकोविचवर येऊ शकते.

फ्रान्सच्या संसदेमध्ये (France's vaccine pass law) कोरोना नियमावलीसंदर्भातील एक विधेयक नुकतेच मंजूर करण्यात आले. या कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी फिरण्यासाठी लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. रेस्टोरंट, कॅफे, सिनेमा हॉल आणि ट्रेन प्रवासादरम्याने प्रत्येक व्यक्तीला कोरोना लस घेतल्याचा पुरावा दाखवावा लागणार आहे. कोरोनाच्या (Corona)पार्श्वभूमीवरील कायदा सर्वांसाठी बंधनकारक आहे.

हेही वाचा: ...म्हणून इंग्लंडच्या हिरोनं नाकारला IPL चा प्रस्ताव

फ्रान्समध्ये भेट देण्यासाठी येणाऱ्या सामान्य व्यक्तीपासून ते व्यावसायिक खेळाडू आणि प्रसिद्ध व्यक्ती या सर्वांसाठी एकच नियम असेल, असे क्रीडा मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेचे आयोजन हे मे महिन्यात आहे. तोपर्यंत परिस्थिती बदलूही शकते. पण सध्याच्या घडीला कोणत्याही खेळाडूला लसीकरणाच्या प्रकरणात सूट मिळणार नाही, हे फ्रान्सने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: 'IPLच्या पॉवर सेंटर्सची निर्णयामध्ये ढवळाढवळ होऊ नये'

सर्बियन नोवाक जोकोविचसह नदाल आणि फेडररने संयुक्तरित्या 20 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत 21 व्या ग्रँडस्लॅमला गवसणी घालून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याची जोकोविचला संधी होती. पण कोरोना लस न घेतल्याने त्याची ही संधी लांबणीवर पडली आहे. यासाठी त्याला फ्रेंच ओपन स्पर्धेपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले असताना आता इथेही त्याला अडथळे निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

Web Title: No Vaccine No French Open For Djokovic Says French Sports Ministry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top