Magnus Carlsen angry reaction viral video : विश्वविजेत्या डी गुकेश याने नॉर्वे ओपन स्पर्धेत क्लासिकल डावात जागतिक क्रमवारीतील अव्वल मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. डी गुकेशचे डावपेच ओळखण्यात अपयशी ठरल्यानंतर कार्लसनला राग अनावर झाला अन् चेक-मेट होताच त्याने राग टेबलवर काढला. त्याने जोरात टेबलवर हात आपटला आणि त्यामुळे पटावरील सर्व सोंगट्या पडल्या. आपली चूक लक्षात त्याने त्याने लगेच त्या सोंगट्या व्यवस्थित केल्या आणि गुकेशला हात मिळवून तिथून निघून गेला.