Novak Djokovic: कोणतीही किंमत चुकवायला तयार; लसीकरणावरून मोठं वक्तव्य

Novak Djokovic Big Statement About Participation in Tournaments if They Mandatory Vaccinated
Novak Djokovic Big Statement About Participation in Tournaments if They Mandatory VaccinatedEsakal

स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकेविचने (Novak Djokovic) ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये घडलेल्या प्रकारानंतर लसीकरणाबाबत (Vaccination) एक मोठे वक्तव्य केले आहे. बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत नोव्हाक जोकेविचने सांगितले की 'तो कोणतीही किंमत जुकवायला तयार आहे. कारण माझ्या शरिराबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार हा मला कोणत्याही विजेतेपदापेक्षा किंवा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्वाचा वाटतो.' (Novak Djokovic Big Statement About Participation in Tournaments if They Mandatory Vaccinated)

Novak Djokovic Big Statement About Participation in Tournaments if They Mandatory Vaccinated
CSK ने रैनाला वाऱ्यावर सोडण्याचे दिले कारण; इरफान देखील भडकला

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोविचला, लसीकरणाबाबत घेतलेल्या भुमिकेसाठी तो फ्रेंच ओपन (French Open) आणि विंबल्डन (Wimbledon) सारख्या प्रतिष्ठित ग्रँडस्लॅमवरही पाणी सोडणार का असे विचराण्यात आले. त्यावर उत्तर देताना जोकोविच म्हणाला की, 'हो मी ती किंमत मोजायला तयार आहे.' तो पुढे म्हणाला की, 'माझ्या शरिराबाबत निर्णय घेण्याबाबतची माजी तत्वे स्पष्ट आहेत. ती कोणत्याही विजेतेपदापेक्षा महत्वाची आहेत. जितके शक्य आहे तिकते मी माझे शरीर तंदुरूस्त ठेवायचा प्रयत्न करतोय.'

जोकोविचने लसीकरणाबाबत (Corona Vaccination) आपले मत स्पष्ट केले. तो म्हणाला की, 'मी लसीकरणाच्या विरोधात नाही. मला माहिती आहे की जागतिक स्तरावर प्रत्येक जण कोरोना विषाणूशी लढत आहे. मला आशा आहे की हे लवकरच संपुष्टात येईल.'

Novak Djokovic Big Statement About Participation in Tournaments if They Mandatory Vaccinated
ग्लेन मॅक्सवेलची 'तामिळ' लग्नपत्रिका व्हायरल, लग्नाला यायचं बरं का!

या मुलाखतीत जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open 2022) झालेल्या प्रकाराबद्दलही बोलला. तो म्हणाला की, 'मी माझ्या स्टारडमचा वापर ऑस्ट्रेलियात घुसण्यासाठी वापरला नाही. मला जशी सामान्यांना वागणूक मिळते तशीच मिळाली. मला जो मेल मिळाला तो सगळ्या खेळाडूंना मिळाला होता. शेकडो टेनिसपटूंना हा मेल मिळाला होता. आम्ही नियमांचे पालनच केले. नियमाअंतर्गत जेथे वैद्यकीय सूट शक्य होती ती वापरण्याचा मी प्रयत्न केला आणि अर्ज केला.'

जोकोविच पुढे म्हणाला की, 'मी माझ्या पीसीआर (PCR) चाचणीचा अहवाल दाखवला. माझ्या शरिरात त्यावेळी पुरेशा अँटी बॉडीज् होत्या. हे सर्व ऑस्ट्रेलियाच्या दोन स्वतंत्र वैद्यकीय समितींनी मान्य केले होते. हेही सांगणे गरजेचे आहे की माझे नाव त्या अर्जावर नव्हते.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com