
Novak Djokovic vs Carlos Alcaraz: सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने मंगळवारी ऐतिहासिक विजयाची नोंद केली. गेल्या काही वर्षापासून त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी कार्लोस अल्काराजविरुद्ध त्याने मंगळवारी ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला.
त्याने अल्काराजला एकेरीत ४-६, ६-४,६-३,६-४ असा चार सेटमध्ये विजय मिळवला. या विजयासह जोकोविच उपांत्य सामन्यात पोहचला असून विक्रमी २५ व्या ग्रँडस्लॅमपासून आता केवळ दोन पाऊले दूर आहे.