नोव्हाक जोकोविचचे आव्हान संपुष्टात

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 मार्च 2019

इंडियन वेल्स - सर्बियाच्या अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याचे इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले. जर्मनीच्या फिलीप कोलश्रायबरने त्याचा सरळ सेटमध्ये ६-४, ६-४ असा पराभव केला. त्याची गाठ आता गेल मोंफिसशी होईल.

महिला विभागात नाओमी ओसाका आणि सिमोना हालेप यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. नाओमीला चौथ्या  फेरीत बेलिंडा बेनसिच हिने ३-६, १-६ असे हरवले. नाओमी हिने गेल्या वर्षी येथे विजेतेपद मिळविले होते. सिमोना हालेप हिला मार्केटा वोनद्रोसोवा हिने पराभूत केले. व्हीनसने उपांत्यपूर्व फेरी गाठताना मोना बार्थेल हिचा ६-४, ६-४ असा पराभव केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Novak Djokovic Falls