
Australian Open 2021 : जोकोविचला झटका! ऑस्ट्रेलियन व्हिसाचं अपील फेटाळलं
सिडनी : जगातील अव्वल टेनिस खेळाडू नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याला ऑस्ट्रेलियन कोर्टानं मोठा झटका दिला आहे. जोकोविचचा व्हिसा रद्द केल्याविरोधात त्यानं कोर्टात अपिल केलं होतं. पण कोर्टानं त्याची याचिका फेटाळून लावली. त्यामुळं आता जोकोविचला यंदा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open) सहभागी होता येणार नाही. त्यामुळं त्याला आता ऑस्ट्रेलियातून परतावं लागणार आहे. (Novak Djokovic loses Australian visa appeal)
सोमवारी १७ जानेवारीपासून सुरु होत असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन २०२१च्या एक दिवस आगोदर मेलबर्नच्या फेडरल कोर्टानं जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा ऑस्ट्रेलियन सरकारचा निर्णय कायम ठेवला. यामुळं लवकरच जोकोविचला ऑस्ट्रेलियातून मायदेशी सर्बियाला परतावं लागणार आहे.
हेही वाचा: १४४ वर्षे जुन्या क्लबची इमारत आगीत खाक; कोट्यवधींचे नुकसान
ऑस्ट्रेलियाचे इमिग्रेशन मंत्र्यांनी शुक्रवारी १४ जानेवारी रोजी जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नऊ वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब पटकवण्याचा विक्रम सायबेरियन टेनिसपटू नोकाव जोकोविचच्या नावावर आहे. यंदाही तो या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला. मात्र, त्यानं अद्याप कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. त्यामुळं त्याला मेलबर्न येथे नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.
जोकोविचला ऑस्ट्रेलियात तीन वर्षांसाठी बंदीची शक्यता
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या कोर्टाच्या निर्णयानंतर जोकोविचवर ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेशासाठी तीन वर्षांसाठी बंदी येऊ शकते. कारण ऑस्ट्रेलियाच्या इमिग्रेशन नियमांनुसार, देश सोडण्याचा आदेश दिल्यानंतर ती व्यक्ती तीन वर्षात पुन्हा ऑस्ट्रेलियात परतू शकत नाही.
Web Title: Novak Djokovic Loses Australian Visa Appeal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..