Wimbledon : जोकोविच सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत; फेडररला मागे टाकण्यासाठी सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Novak Djokovic Reached Final in Wimbledon 2022 May Overtake Roger Federer

Wimbledon : जोकोविच सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत; फेडररला मागे टाकण्यासाठी सज्ज

लंडन, ता. ८ : अव्वल मानांकित नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) सलग चौथ्यांदा विम्बल्डन (Wimbledon 2022) टेनिस ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली. त्याने शुक्रवारी झालेल्या पुरुषांच्या एकेरीच्या उपांत्य लढतीत ब्रिटनच्या कॅमरून नोरीवर चार सेटमध्ये विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता येत्या रविवारी जेतेपदाच्या लढतीत त्याला ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओसचा (Nick Kyrgios) सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा: Ravindra Jadeja : टाटा बाय-बाय खतम! जडेजा CSK ला करणार राम राम?

जोकोविच - कॅमरून यांच्यामधील लढतीतील पहिल्या सेटमध्ये कॅमरुनने सर्बियाच्या टेनिसपटूला धक्का दिला. त्याने पहिला सेट ६-२ अशा फरकाने जिंकला. त्यानंतर मात्र जोकोविचने आपल्या प्रतिमेला साजेशा खेळ करीत झोकात पुनरागमन केले. त्याने दुसरा सेट ६-३ अशा फरकाने जिंकत बरोबरी साधली. तिसरा सेट ६-२ अशा फरकाने जिंकण्यात जोकोविचला यश प्राप्त झाले. अखेर चौथा सेट ६-४ अशा फरकाने जिंकून जोकोविचने अंतिम फेरीत वाटचाल केली.

हेही वाचा: Sri Lanka vs Australia : पुन्हा 'जयसूर्या' नावाचं वादळ; इतिहासाची पुनरावृत्ती

सातव्या जेतेपदाची आशा

जोकोविचला आता विम्बल्डनच्या सातव्या जेतेपदाची आशा आहे. राफेल नदालने गुरुवारी दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे आता जोकोविचच्या जेतेपदाची आशा वाढली आहे. जोकोविच ज्यावेळी विम्बल्डन फायनल खेळण्यासाठी मैदानावर उतरेल त्यावेळी तो महान रॉजर फेडररला मागे टाकण्यासाठी जोर लावले. जोकोविचने आपल्या कारकिर्दित आतापर्यंत 20 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. त्याने रॉजर फेडररशी बरोबरी केली आहे. जर त्याने यंदाची विम्बल्डन जिंकली तर तो फेडररलाही मागे टाकेल.

पुरूष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा रेकॉर्ड राफेल नदालच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 22 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. मात्र राफेल नदालला विम्बल्डन 2022 मध्ये सेमी फायनलमधून माघार घ्यावी लागली होती. त्याचा पोटाचा स्नायू दुखावल्यामुळे त्याने सेमी फायनल सुरू होण्यापूर्वीच माघार घेतली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा निक किर्गीओस फायनलमध्ये पोहचला.

Web Title: Novak Djokovic Reached Final In Wimbledon 2022 May Overtake Roger Federer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..