Olympic : हॉकी संघाच्या कर्णधाराला पंतप्रधान मोदींचा कॉल; पाहा VIDEO

Olympic : हॉकी संघाच्या कर्णधाराला पंतप्रधान मोदींचा कॉल; पाहा VIDEO
ANI
Summary

भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमधील चार दशकांपासून मेडलचा दुष्काळ संपवला.

नवी दिल्ली - भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमधील चार दशकांपासून मेडलचा दुष्काळ संपवला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने कांस्य पदक पटकावलं असून संघाचा कर्णधार मनप्रीत सिंहसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह, मुख्य प्रशिक्षक ग्राहम रीड आणि सहाय्यक प्रशिक्षक पीयूष दुबे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. कांस्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे त्यांनी अभिनंदन केलं.

पंतप्रधान मोदींनी कर्णधार मनप्रीत सिंहला तुम्ही इतिहास रचला असं म्हणत अभिनंदन केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसंच बेल्जियमविरुद्ध पराभवानंतर खेळाडू खचले होते. पण आजच्या विजयाने आत्मविश्वास वाढल्याचं आवाजातून जाणवल्याचंही मोदींनी फोनवर सांगितलं.

Olympic : हॉकी संघाच्या कर्णधाराला पंतप्रधान मोदींचा कॉल; पाहा VIDEO
जिंकलस भावा! सिमरनजीतच्या खिलाडूवृत्तीची चर्चा तर होणारच

भारतीय संघाला सातत्यानं प्रोत्साहन दिल्याबद्दल मनप्रीत सिंहने पंतप्रधान मोदींचे आभार मानले. याआधी मोदींनी ट्विटरवरून 41 वर्षांनी ऐतिहासिक कामगिरी करत ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केलं आहे. आजचा दिवस प्रत्येक भारतीयाच्या आठवणीत राहील असंही त्यांनी म्हटलं आहे.

Olympic : हॉकी संघाच्या कर्णधाराला पंतप्रधान मोदींचा कॉल; पाहा VIDEO
VIDEO : जय हो! 5 मिनिटात 3 गोल; पाहा मॅचचा टर्निंग पॉइंट

भारतीय संघाला विजयाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, 'भारताला आपल्या हॉकी संघाचा अभिमान आहे.' भारताने एका रोमहर्षक सामन्यात जर्मनीला 5-4 ने पराभूत करून ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं आहे. मोदींनी ट्विटमध्ये असं म्हटलं की,'ऐतिहासिक! आजचा दिवस प्रत्येक भारतीयाच्या आठवणीत राहील. कांस्य पदक भारतात आणणाऱ्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. त्यांच्या या कामगिरीने त्यांनी संपूर्ण देशाचे, विशेषता तरुणाईचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताला आपल्या हॉकी संघाचा अभिमान आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com