Malaysia Masters | सिंधूने इंडोनेशिया ओपनचा बदला मलेशिया मास्टर्समध्ये घेतला

P V Sindhu Defeat China He Bing Jiao In Malaysia Masters Take Revenge of Indonesia Open Super 1000
P V Sindhu Defeat China He Bing Jiao In Malaysia Masters Take Revenge of Indonesia Open Super 1000esakal
Updated on

Malaysia Masters : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने मलेशिया मास्टर्समध्ये चीनच्या बिंग जिआओचा पहिल्या फेरीत पराभव केला. सातवी सिडेड सिंधून जिआओचा एक तास चाललेल्या सामन्यात 21-13, 17-21, 21-15 अशा तीन गेममध्ये पराभव केला. (P V Sindhu Defeat China He Bing Jiao In Malaysia Masters Take Revenge)

P V Sindhu Defeat China He Bing Jiao In Malaysia Masters Take Revenge of Indonesia Open Super 1000
BCCI | विराट - रोहितवरून इरफान पठाणची बीसीसीआयवर टीका

गेल्या महिन्यात इंडोनेशिया ओपनमध्ये सिंधूला चीनच्या जिआओने पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का दिला होता. त्याचा बदला सिंधूने मलेशिया मास्टरमध्ये बुधवारी घेतला. सिंधू आणि जिआओ यांच्यात आतापर्यंत 19 लढती झाल्या आहेत. त्यातील चीनच्या जिआओने 10 लढती जिंकल्या आहेत तर सिंधूने 9 लढतीत विजय मिळवला आहे. सध्या हेड टू हेडमध्ये जीआओ आघाडीवर आहे. दुसरीकडे मलेशिया ओपन पुरूष एकेरीमध्ये बी साई प्रणीत आणि परूपल्ली कष्यप यांनी देखील दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

P V Sindhu Defeat China He Bing Jiao In Malaysia Masters Take Revenge of Indonesia Open Super 1000
ICC Test Rankings | सहा वर्षात जे झालं नाही ते झालं! 'विराट' रँकिंगची मोठी घसरण

कष्यपने एक गेम गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन केले. त्याने मलेशियाच्या टॉमी सुकिआत्रोचा 16-21, 21-16, 21-16 असा पराभव केला. दुसरीकडे समीर वर्माला तैवानच्या चाऊ टैन चेनने 21-10, 12-21, 14-21 असे पराभूत करून त्याचे आव्हान संपवले. आज एचएस प्रणॉय, सायना नेहवाल आणि महिला दुहेरीची जोडी एन सिक्की रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांचा सामना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com