पाक क्रिकेटरची मुक्ताफळे, 'आफ्रिदीची बॉलिंग बुमराहपेक्षा खतरनाक'

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा दावा शाहीन आफ्रिदीच्या तुलनेत जसप्रीत बुमराहची कामगिरी कमी
Aqib Javed says jasprit bumrah Shaheen Afridi
Aqib Javed says jasprit bumrah Shaheen Afridisakal

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) हे सध्या जगातील दोन सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. या दोन्ही गोलंदाजांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट स्पेल करत प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या मनात भीती निर्माण केली आहे. जिथे हे दोघे कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानकडून खेळतात. बुमराह आणि आफ्रिदी हे सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक मानले जातात. पण पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू (PAK Cricketer) आकिब जावेद (Aqib Javed) याने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मोठे वक्तव्य केले आहे.

आकिब जावेदने पाकिस्तानच्या एका टी.व्ही शी वर बोलताना म्हणाला बुमराहची गोलंदाजी शाहीन आफ्रिदीपेक्षा कमी धोकादायक आहे. जसप्रीतची आताची कामगिरी पाहता त्याचा ग्राफ स्थिर आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीच्या तुलनेत तो खूपच कमी आक्रमक गोलंदाज आहे. त्याचबरोबर शाहीन दिवसेंदिवस अधिकाधिक खतरनाक होत चला आहे.

Aqib Javed says jasprit bumrah Shaheen Afridi
IPL 2022: ऋषी धवनची 'फेस शील्ड' गोलंदाजी; नेटकरी अवाक

पाकिस्तानच्या शाहीनने अलीकडेच ICC पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर २०२१ ठरला आहे. गेल्या वर्षी त्यानी 36 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 22.20 च्या सरासरीने 78 बळी घेतले आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत त्याने पाकिस्तानसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सहा सामन्यांमध्ये 7 विकेट घेतल्या होत्या. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने रोहित शर्मा, KL राहुल आणि विराट कोहली यांना एका टप्प्यात बाद केले होते. पाकिस्तानच्या विश्वचषकात प्रथमच भारताविरुद्ध पाकिस्तानला विजय मिळवून देण्यात तो यशस्वी ठरला होता.

बुमराहबद्दल बोलायचे झाले तर हा भारतीय गोलंदाज सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. आत्तापर्यंत 156 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जसप्रीतने एकूण 303 विकेट्स घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com