PAK vs AUS : बाबर-लायनमध्ये रंगला स्लेजिंगचा खेळ; शेवटी...

PAK vs AUS 2nd test
PAK vs AUS 2nd testSakal

PAK vs AUS 2nd test: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना देखील अनिर्णित राहिला. कराचीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ मजबूत स्थितीत होता. ऑस्ट्रेलियाने यजमान पाकिस्तान संघासमोर 506 धावांचे लक्ष्य ठेवले होते. आधी कांगारुंच्या बाजूनं झुकलेला सामना पाकिस्तान कर्णधार बाबर आझमने पाकिस्तानच्या बाजूनं वळवला. बाबरच्या दमदार खेळीच्या जोरावर अखेरच्या दिवशी पाकिस्तानने कांगारुंना कडवी टक्कर दिली.

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याचे अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकले. पण मैदानात सर्वाधिक वेळ मैदानात उभारण्याचा विक्रम नोंदवत त्याने सामना अनिर्णित राखणारी खेळी केली. बाबर आझम ऑस्ट्रेलियाच्या विजयात अडथळा बनून उभा राहिला होता. सामन्याच्या अखेरच्या दिवशी बाबर आझम आणि फिरकीपटू नॅथन लायन यांच्यात मैदानावर जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले.

PAK vs AUS 2nd test
मितालीनं चार चौघींवर फोडलं पराभवाचं खापर

लायन याने बाबर विरोधात पायचितची (LBW) अपील केली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बाबरच्या विकेटसाठी रिव्ह्यूही घेतला. यावेळी चेंडू ऑफ स्टम्पवर जात असल्याचे दिसून आले. पण अंपाय कॉल असल्याने बाबर वाचला. या घटनेनंतर दोघांच्या शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना भिडण्याची ही पहिलीच वेळ होती. लायन यानेच शेवटी बाबरला बादही केले.

PAK vs AUS 2nd test
Photos : आयपीएलआधी लगीन घाई; राहुल-इशानीचं शुभमंगल!

कराची कसोटीतील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 556 धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघाचा पहिला डाव 148 धावांत आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 2 बाद 97 धावा करत पाकिस्तानसमोर 506 धावांचे आव्हान दिले होते. बाबर आझमच्या दमदार 196 धावा केल्या. त्याच्याशिवाय मोहम्मद रिझवानने नाबाद 104 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय सलामीवीर शफीकने 96 धावा केल्या. या त्रिकूटाच्या खेळाच्या जोरावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. पाकिस्तानने दुसऱ्या डावात 7 बाद 443 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com