
VIDEO : किती रडवणार? पॅट कमिन्सनं पाक चाहत्याला असा दिला रिप्लाय
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात कराची नॅशनल स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. कागारुंनी घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पाकिस्तान संघाची अवस्था बिकट केली आहे. पहिल्या डावात 556 धावांचा डोंगर रचल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पाक फलंदाजांना गुडघे टेकायला लावले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पाकचा पहिला डाव 148 धावांत आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डाव 97 धावा करुन घोषीत केला.
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर 506 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हा सामना पाकिस्तानच्या हातून निसटताना दिसतोय. त्यांच्या पराभवाची केवळ औपचारिकताच बाकी उरलीये. दरम्यान स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आलेला पाकिस्तानी चाहता आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार यांच्यातील अप्रत्यक्ष चर्चेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
हेही वाचा: साध्याभोळ्या कोचची थोडी गंमत; हार्दिक पांड्याचं वक्तव्य चर्चेत
पाक चाहत्याची कमिन्सला विनंती
कराची कसोटीदरम्यान सोशल मीडिया एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात मॅच पाहण्यासाठी स्टेडियमवर आलेला पाकिस्तानमधील क्रिकेट चाहता पॅट कमिन्सकडे डाव घोषीत करण्याची विनंती करताना दिसते. कराची कसोटीतील दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रातील खेळात ऑस्ट्रेलियनं संघ 500 धावांकडे वाटचाल करत होता. त्यावेळी पाकिस्तानी गोलंदाजांच्या निराशजनक कामगिरीनंतर पाक चाहत्याने कमिन्सला एक पोस्टर दाखवले. "कमिन्स भाई कृपया डाव घोषीत कर" असे या पोस्टरवर लिहिले होते. यावेळी कॅमेरा अभी नही... अशा तोऱ्यात मान हलवताना दिसले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा: IPL 2022 : सलामी लढतीपूर्वी मुंबई इंडियन्सला धक्का!
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवातही रावळपिंडीच्या मैदानातील कसोटी सामन्याने झाली होती. पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. खेळाडूंपेक्षा अधिक चर्चाही रावळपिंडीच्या खेळपट्टीची झाली. त्यानंतर आता पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने दमदार कामगिरीसह पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले आहे. चौथ्या दिवशी पाकिस्तानच्या संघाने दुसऱ्या डावातही दोन विकेट्स गमावल्या होत्या.
Web Title: Pak Vs Aus Fan Requests Pat Cummins Declare Australias Innings During Karachi Test
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..