

Pakistan Airstrike Kills Afghan Cricketers Rashid Khan Expresses Grief Over Deadly Attack
Esakal
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यात अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंसह अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार राशिद खानने पाकिस्तानवर हल्लाबोल केलाय. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात तीन क्रिकेटर्सचा मृत्यू झालाय. हा हल्ला अनैतिक आणि विध्वंसक असल्याचं राशिद खानने म्हटलंय. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबतच्या तिरंगी मालिकेत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलंय.