Babar Azam : पाकिस्तानसाठी बाबर आझम झुंजला मात्र चाहत्यांनी केली मोठी निराशा

Babar Azam Asia Cup 2023
Babar Azam Asia Cup 2023esakal

Babar Azam Asia Cup 2023 : आशिया कप 2023 मध्ये पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने नेपाळसमोर 50 षटकात 6 बाद 342 धावांचा डोंगर उभा केला. सुरूवातीच्या पडझडीनंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने 151 धावांची दीड शतकी खेळी केली.

त्याला इफ्तकार अहमदने नाबाद 109 धावांची शतकी खेळी करत चांगली साथ दिली. बाबर आझमने धडाकेबाज फलंदाजी केली मात्र मुल्तानमध्ये सुरू असलेल्या आशिया कपच्या या पहिल्याच सामन्याकडे पाकिस्तानी चाहत्यांनी सपशेल पाठ फिरली. मुल्तानचं क्रिकेट मैदान ओस पडलं होतं.

Babar Azam Asia Cup 2023
Mohammed Shami : हुआ छोकरा जवां रे.... पंतचं ते ट्विट लागलं जिव्हारी, शमीचा कायापालट झाला

आशिया कप 2023 मध्ये नवख्या नेपाळने पाकिस्तानची अवस्था 4 बाद 124 धावा अशी केली होती. दोन्ही सलामीवीर आणि मोहम्मद रिझवानने कर्णधार बाबर आझमची साथ सोडली होती. मात्र बाबर आझमने इफ्तिकार अहमदला सोबत घेत पाकिस्तानचा नुसता डाव सावरला नाही तर चौथ्या विकेटसाठी 214 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली.

इफ्तिकार अहमदने तर 67 चेंडूतच शतकी खेळी केली. ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली शतकी खेळी ठरली.

Babar Azam Asia Cup 2023
PAK vs NEP Asia Cup 2023 : हलक्यात नाही घ्यायचं! नवख्या नेपाळची बाप फिल्डिंग, मोहम्मद रिझवान तर...

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानची सुरूवात खराब झाली होती. नेपाळच्या करण केसीने सलामीवीर फकर जमानला 14 धावांवर बाद केले तर रोहित पौडेलने दुसरा सलामीवीर इमाम - उल - हकला 5 धावांवर धावबाद केले. यामुळे पाकिस्तानची अवस्था 6.1 षटकात 2 बाद 25 धावा अशी झाली. यानंतर अनुभवी जोडी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी रचली.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com