
रवी शास्त्रीं मुळेच विराट कोहलीची ही अवस्था; पाकच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य
भारतीय फलंदाज विराट कोहलीचा खराब फॉर्म गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय झाला आहे. कोहलीच्या बॅटने शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक दोन वर्षांपूर्वी केले होते. कोहलीने शेवटचे शतक नोव्हेंबर 2019 मध्ये केले होते. आयपीएल 2022 मध्येही त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी 22.73 च्या सरासरीने केवळ 341 धावा केल्या होत्या. आता भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे जिथे भारतीय संघाला गेल्या वर्षीच्या मालिकेतील एक उर्वरित सामना खेळायचा आहे. कोहली एकमेव कसोटी सामन्यातून पुनरागमन करणार अशी चाहत्यांना आशा आहे.(ravi shastri for virat kohli)
हेही वाचा: Ranji Trophy Final: मध्यप्रदेशविरुद्ध मुंबईचे फलंदाज चमकले, पहिल्या दिवशी 248/5
कोहलीच्या अलीकडच्या फॉर्मबद्दल अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी आपले मतं मांडली आहे. शेजारी देश पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफ याने एक विधान केले आहे. कोहलीच्या खराब फॉर्मसाठी लतीफने माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जबाबदार धरले आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना लतीफ म्हणाला की, शास्त्री कोहलीचा कोचिंगशी काहीही संबंध नाही.
हेही वाचा: ICC Ranking मध्ये दिनेश कार्तिकची झेप, टॉप-10 ईशान एकमेव भारतीय
पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफ एका यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, विराट कोहलीच्या खराब फॉर्ममागे रवी शास्त्री आहे. रवी शास्त्री जर या संघाचे प्रशिक्षक नसते झाले तर विराट कोहली कधीही असा बाहेर बसला नसता, असे तो म्हणाले आहे. 2019 मध्ये तुम्ही कुंबळेसारख्या कोचला वगळून रवी शास्त्रीना कोच बनवण्यात आले, तो कोणत्यातरी ब्रॉडकास्टिंग कंपनीत काम करत होता, त्यावेळी त्याला कोचिंगबद्दल काहीच कल्पना नव्हती, मला वाटले होते की ते उलट होईल आणि तसेही झाले. शास्त्री प्रशिक्षक झाले नसते तर कोहलीचा फॉर्म गेला नसता.
Web Title: Pakistan Captain Rashid Latif Blames Ravi Shastri For Virat Kohli Poor Sports Cricket
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..