BAN vs PAK : पाकिस्तानची सेमी फायनलच्या दिशेने कूच; बांगलादेशला स्वस्तात गुंडाळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan vs Bangladesh

BAN vs PAK : पाकिस्तानची सेमी फायनलच्या दिशेने कूच; बांगलादेशला स्वस्तात गुंडाळले

Bangladesh vs Pakistan : टी 20 वर्ल्डकपमधील सुपर 12 फेरीतील शेवटच्या दिवशी पाकिस्तानची सेमी फायनल गाठण्याची शक्यता चांगलीच वाढली आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला 20 षटकात 8 बाद 127 धावात रोखले. जर पाकिस्तानने हे आव्हान पार केले तर ते भारतासोबत सेमी फायनलसाठी पात्र होतील. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने मोक्याच्या सामन्यात आपली कामगिरी उंचावत बांगलादेशचे 4 बळी टिपले. तर बांगलादेशकडून नजमुल हुसैन शांतोने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याला इतर फलंदाजांनी चांगली साथ दिली नाही.

हेही वाचा: T20 World Cup : ऑस्ट्रेलियात दुबळ्या संघांनी केली क्रांती! तब्बल सहा अपसेट

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. लिटन दास आणि शांतो यांनी आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली होती. मात्र शाहीन आफ्रिदीने भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या लिटन दासला 10 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर सौम्या सरकार आणि शांतोने भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी बांगलादेशला 10 षटकता 73 धावांपर्यंत पोहववले. मात्र शादाब खानने सौम्या सरकारला 20 तर कर्णधार शाकिबला पुढच्याच चेंडूवर शुन्यावर बाद करत बांगलादेशला दोन मोठे धक्के दिले. शाकिबचा निर्णय वादग्रस्त ठरला.

हेही वाचा: Sania Mirza : ते क्षण जे मला सर्वात कठीण दिवसांतून...सानिया मिर्झा देणार शोएबला घटस्फोट?

दरम्यान, शांतोने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्याला बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारून देण्यात अपयश आले. तो इफ्तिकार अहमदची शिकार झाला. यानंतर बांगलादेशची फलंदाजी ढासळू लागली. शाहीन आफ्रिदीने एकाच षटकात मोसादेक हुसैन आणि नुरूल हसन यांना बाद केले. त्यानंतर टस्किन अहमदची देखील शिकार केली. दरम्यान, अफिफ हुसैनने 20 चेंडूत नाबाद 24 धावा करत संघाला 127 धावांपर्यंत पोहचवले.