Shahid Afridi Reaction | "आपल्या हवं तसं पिच बनवूनच जिंकत राहणार का?", आफ्रिदीचा खोचक सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shahid afridi

टी२० मालिका विजयानंतर शाहिद आफ्रिदी बरळला

"आपल्या हवं तसं पिच बनवूनच जिंकत राहणार का?", आफ्रिदीचा सवाल

Shahid Afridi Reaction : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी नेहमी भारतीय चाहत्यांच्या टीकेचं लक्ष्य ठरतो. तो स्वत:ही नेहमी भारतीय संघावर टीका करत असतो. पण नुकतीच पाकिस्तान विरूद्ध बांगलादेश टी२० मालिका झाली. या मालिकेत बांगलादेशला ३-०ने पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या सामन्यात बांगलादेशच्या संघाला विजयाची संधी होती, पण शेवटच्या चेंडूवर त्यांना पराभूत व्हावे लागले. त्यानंतर शाहिद आफ्रिदीने बांगलादेशच्या संघावर टीका केली आणि त्यांना सल्लाही दिला.

हेही वाचा: IND vs NZ : टीम इंडियाला मोठा धक्का; स्टार फलंदाज मालिकेबाहेर

"बांगलादेशच्या खेळाडूंनी आणि संघ व्यवस्थापनाने आत्मपरिक्षण करायला हवं की त्यांनी स्वत:ला हव्या असलेली पिच तयार करूनच सामने जिंकायचे आहेत का? साधारण कामगिरी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि वर्ल्ड कपमध्ये खराब कामगिरीच करायची आहे का? बांगलादेशच्या संघाकडे भरपूर प्रतिभा आहे. खेळ जिंकण्याची त्यांच्यात जिद्द आहे. पण त्यांना त्यांचा खेळ सुधारायचा असेल तर चांगल्या खेळपट्ट्या बनवाव्याच लागतील", असं ट्वीट करत आफ्रिदीने बांगलादेशला सल्ला दिला.

हेही वाचा: IND vs NZ: "डोक्यात लगेच हवा जाऊ देऊ नका"; द्रविडची ताकीद

आफ्रिदीने त्याच्या आधीच्या ट्वीटमध्ये पाकिस्तानच्या संघाचेही कौतुक केले. पाकिस्तानचं अभिनंदन करताना त्याने नमूद केलं की शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी पाकला जास्त प्रयत्न करावा लागला. पण मालिका जिंकल्याचा आनंद आहे. विजयपथावर पाकिस्तानचा संघ कायम आहे हे पाहून मला खरंच चांगलं वाटतंय. चांगला खेळ करत राहा, असं आफ्रिदी म्हणाला.

loading image
go to top