VIDEO : I Love India पाकिस्तान पेसर Hasan Ali चा व्हिडिओ होतोय व्हायरल

Pakistan Pacer Hasan Ali
Pakistan Pacer Hasan Ali esakal

Hasan Ali IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपमधील हाय व्होल्टेज सामना झाला. भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव करत ग्रुप A मधील आपला पहिला सामना जिंकला. सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडू आणि पाकिस्तान संघातील खेळाडू एकमेकांना भेटले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. विराट कोहलीने हारिस रौफला त्याची स्वाक्षरी केलेली इंडियन जर्सी भेट दिली. मोहम्मद रिजवान आणि हार्दिक पांड्या यांच्यात देखील चेष्टा मस्करी सरू असल्याचा व्हिडिओ आला. दरम्यान, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो I Love India असं म्हणतोय.

Pakistan Pacer Hasan Ali
Hardik Pandya : मी फक्त एक नवखा मुलगा होतो, धोनीने...
Pakistan Pacer Hasan Ali
David Warner : क्रिकेटनंतर इंस्टावर धुमाकूळ घालणारा डेव्हिड वॉर्नर झाला गणेशभक्तीत लीन

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने सरावादरम्यान नेट्समध्ये खूप घाम गाळला. सराव सत्र संपल्यानंतर तो मैदानावरून परतत असताना त्याला काही फॅन्सनी आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत. त्यावर हसन अली भारतात माझे फॅन्स असणारच कारण I Love India असं म्हणाला. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब अख्तरबरोबरच हसन अलीचे लग्न देखील भारतात झाले आहे. 2019 मध्ये हसन अलीने हरियाणामध्ये राहणाऱ्या शामिया आरजूबरोबर लग्न केले होते.

हसन अलीने आतापर्यंत पाकिस्तानकडून 21 कसोटी सामन्यात 77 विकेट्स घेतल्या आहेत. तर 60 वनडे सामन्यात 91 आणि 49 टी 20 सामन्यात 60 विकेट्स घेतल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com