
'या' कारणाने लंकेने पाकविरूद्धची वनडे मालिका केली रद्द?
Pakistan vs Sri Lanka ODI Series Canceled: पाकिस्तान क्रिकेट संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौरा करणार आहे. या दौऱ्यावर पाकिस्तान संघ दोन कसोटी आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार होता. मात्र आता वनडे मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पाकिस्तान श्रीलंकेविरूद्ध फक्त दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग असणार आहे.
हेही वाचा: VIDEO : फुटबॉलपटू सुनिल छेत्रीला लागलंय क्रिकेटचं 'याड'
पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील रद्द झालेली वनडे मालिका ही वर्लडकप सुपर लीगचा भाग नव्हती. क्रिकेट पाकिस्तानच्या एका अहवालानुसार श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दौऱ्यातून वनडे मालिका (ODI Series) काढून टाकण्याची विनंती केली होती. कारण बोर्ड एका आठवडा आधी लंका प्रीमियर लीग (LPL) सुरू करण्याची योजना आखत होती.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे निर्देशक सामी-उल-हसन बर्नी यांच्या हवाल्याने एका रिपोर्टमध्ये 'श्रीलंका क्रिकेट बोर्ड आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी एक आठवडा आधीच लीग सुरू करू इच्छिते. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानला वनडे मालिका रद्द करण्याची विनंती केली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही विनंती मान्य केली आहे. ही वनडे मालिका वर्ल्डकप सुपर लीगचा भाग नव्हती. त्यामुळे पाकिस्तानला देखील कोणतीच अडचण नव्हती. मालिकेच्या कार्यक्रमाबाबत अजून चर्चा सुरू आहे. लवकरच यावर एक अहवाल प्रसिद्ध केला जाईल.'
हेही वाचा: धक्कादायक! टी 20 वर्ल्डकपमध्ये मोहम्मद रिझवानला दिले होते प्रतिबंधित औषध?
एका अहवालानुसार श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे देशभरात घरगुती वापरासाठी फक्त 12 तास वीज उपलब्ध केली जाणार आहे. वीजेच्या कपातीमुळे डे नाईट सामन्याचे आयोजन करणे श्रीलंका क्रिकेट बोर्डाला अडचणीचे ठरणार होते. कारण श्रीलंकेच्या स्टेडियममध्ये जनरेटरद्वारे लाईट देणे देखील मुश्कील झाले आहे. कारण लंका इंधन तुटवड्याला देखील सामोरे जात आहे.
Web Title: Pakistan Tour Of Sri Lanka Odi Series Canceled
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..