PAK vs ENG : पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली अन् सोशल मीडियावर मीम्सचा आला महापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 pakistan vs england

PAK vs ENG : पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली अन् सोशल मीडियावर मीम्सचा आला महापूर

PAK vs ENG : टी-20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाला 20 षटकांत 8 विकेट गमावून केवळ 137 धावा करता आल्या. संघातील एकाही खेळाडूला नीट फलंदाजी करता आली नाही. संघाचा महान खेळाडू मानला जाणारा मोहम्मद रिझवान लवकरच आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. बाबरने 32 धावांची खेळी खेळली असली तरी त्याच्याकडून अपेक्षा खूप होत्या.

हेही वाचा: Shoaib Malik : घटस्फोटांच्या चर्चांना ऊत आला असताना मलिक लाईव्ह शो मध्ये ढसाढसा रडला - VIDEO

याशिवाय शान मसूदनेही 38 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानी संघाची फलंदाजी पाहून लोकांना अजिबात मजा आली नाही. अशा परिस्थितीत सोशल मीडियावरही लोक टीमची खिल्ली उडवत आहेत.

हेही वाचा: Adil Rashid : एका 'पाकिस्तानी'नेच पाकिस्तानची लावली वाट, आवडत्या बाबरची केली शिकार

पाकिस्तानची ढेपाळली फलंदाजी पाहून सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे. काही जण इफ्तिखार अहमदच्या खराब फलंदाजीची खिल्ली उडवत आहेत तर काही मीम्सच्या माध्यमातून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या स्थितीचे वर्णन करत आहेत.