डावात ४२८ धावा करणाऱ्या पाक खेळाडूचे निधन; वडील महाराष्ट्राकडून खेळले होते रणजी

डावात ४२८ धावा करणाऱ्या पाक खेळाडूचे निधन; वडील महाराष्ट्राकडून खेळले होते रणजी

कराची : पाकिस्तानचे माजी क्रिकेटर आफताब बलोच (Aftab Baloch) यांचे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांची एका डावात ४२८ धावांची खेळी पाकिस्तानच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गाजली होती. या खेळीसाठीच त्यांना ओळखले जाते. बलोच यांनी १९७३ - ७४ मध्ये कराचीत सिंध प्रांतकडून खेळताना बलोचिस्तान विरूद्ध ४२८ धावांची खेळी केली होती. सिंधने आपला डाव ९५१ धावांवर घोषित केला होता. त्यावेळी त्यांनी जावेद मियांदादबरोबर पाचव्या विकेटसाठी १७४ धावांची भागीदारी केली होती. (Pakistani Cricketer Aftab Baloch whos Father Play Ranji Trophy for Maharashtra Passed Away)

डावात ४२८ धावा करणाऱ्या पाक खेळाडूचे निधन; वडील महाराष्ट्राकडून खेळले होते रणजी
Video: 'सौरभ गांगुलीने कुठे वर्ल्डकप जिंकलाय म्हणून काय तो...'

मात्र त्यांना पाकिस्तानकडून (Pakistan Cricket Team) फारशी खेळण्याची संधी मिळाली नाही. ते पाकिस्तानकडून फक्त २ कसोटी सामने खेळले. त्यांनी १६ व्या वर्षी १९६९ मध्ये न्यूझीलंडविरूद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ( Test Cricket) पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांना २५ धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर ६ वर्षांनी त्यांनी वेस्ट इंडीज बरोबर आपला दुसरा कसोटी सामना खेळला. त्यावेळी त्यांनी १२ आणि नाबाद ६० धावा केल्या होत्या. त्यानंतर त्यांना पाकिस्तान संघात कधी संधी मिळाली नाही.

डावात ४२८ धावा करणाऱ्या पाक खेळाडूचे निधन; वडील महाराष्ट्राकडून खेळले होते रणजी
नावावरून लखनौ सुपर जायंटचे राजस्थान रॉयल्सबरोबर ट्विटर वॉर

वडील होते रणजी ट्रॉफी प्लेयर

आफताब बलोच यांचे वडील शमशेर बलोच हे फाळणीच्या आधी गुजराज आणि महाराष्ट्राकडून (Maharashtra) रणीजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळायचे. १६ व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या आफताब बलोच यांनी १७२ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. त्यात ९ हजार १७१ धावा आणि २२३ विकेट घेतल्या होत्या. त्यांनी २० शतक आणि ४५ अर्धशतके ठोकली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) चेअरमन रमीझ राजा यांनी बलोच यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. रमीझ राजा ज्यावेळी लहानाचे मोठे होत होते त्यावेळी बलोच हे एक लोकप्रिय क्रिकेटर होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com