नावावरून लखनौ सुपर जायंटचे राजस्थान रॉयल्सबरोबर ट्विटर वॉर

Twitter War between IPL Franchise Lucknow Super Giants and Rajasthan Royals
Twitter War between IPL Franchise Lucknow Super Giants and Rajasthan Royals esakal

बीसीसआयने आयपीएल २०२२ (IPL 2022) ची तारीख जाहीर करताच भारतीय क्रिकेट वर्तुळात आता आयपीएलच्या १५ व्या हंगामाची क्रेझ निर्माण होताना दिसत आहे. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात ८ नाही तर १० संघ संहभागी होणार आहेत. तसेच हा हंगाम भारतातच खेळवण्यासाठी बीसीसीआय आग्रही आहे. (Twitter War between IPL Franchise Lucknow Super Giants and Rajasthan Royals over name)

दरम्यान, लखनौ आणि अहमदाबाद (Lucknow and Ahmedabad) या दोन नव्या संघांचा आयपीएलच्या १५ व्या हंगामापासून समावेश करण्यात येणार आहे. या दोन्ही संघांना इतर संघांप्रमाणेच मेगा ऑक्शनपूर्वी (IPL Mega Auction 2022) आपले प्रत्येकी चार खेळाडू आधी विकत घेण्याची मुभा देण्यात आली होती. या दोन्ही संघांनी प्रत्येकी ३ खेळाडू विकत घेतले आहेत. मात्र ही प्रक्रिया पार पडेपर्यंत या दोन संघांचे अधिकृत नामकरण झाले नव्हते.

Twitter War between IPL Franchise Lucknow Super Giants and Rajasthan Royals
द्रविड सरांकडून कानउघाडणी; अपयश अस्तित्वाची जाणीव करून देणारे

आता लखनौने आपल्या संघाचे नाव घोषित केले आहे. लखनौ संघ आता लखनौ सुपर जायंट (Lucknow Super Giants) नावाने ओळखला जाईल. पुणे सुपर जायंटची (Rising Pune Supergiant) मालकी असलेल्या आरपीएसजी ग्रुपनेच (RPSG Group) लखनौ संघ विकत घेतल्याने त्यांनी आपल्या नव्या फ्रेंचायजीचे नाव लखनौ सुपर जायंट असे ठेवले आहे. यावरून राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) रायजिंग पुणे सुपरजायंट आणि लखनौ सुपर जायंट या नावातील सारखेपणावर बोट ठेवत परेश रावल यांचा जुळ्यांची भुमिका केलेला एक फोटो शेअर करत लखनौची खेचण्याचा प्रयत्न केला.

Twitter War between IPL Franchise Lucknow Super Giants and Rajasthan Royals
मालिका विजयानंतर केशव महाराजचे 'जय श्री राम'

याला प्रत्युत्तर देताना लखनौ सुपर जायंटनेही राजस्थान रॉयल्सच्या वर्मावर बोट ठेवले. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघांवर मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे दोन वर्षाची बंदी होती. लखनौ सुपर जायंटने याच वर्मावर बोट ठेवत ते दोन वर्षे आम्ही तुम्हाला मिस केलं असे खोचक ट्विट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com