IND vs NZ T20I | पाकिस्तानी क्रिकेटर न्यूझीलंडला हरवणाऱ्या 'टीम इंडिया'वर फिदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

न्यूझीलंड विरोधातील टी२० मालिकेत भारताची दमदार कामगिरी

पाकचा क्रिकेटर न्यूझीलंडला हरवणाऱ्या 'टीम इंडिया'वर फिदा

sakal_logo
By
विराज भागवत

IND vs NZ, T20 Series : भारतीय संघाने टी२० मालिकेत न्यूझीलंडविरूद्ध २-०ने विजयी आघाडी घेतली. टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. भारतीय संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर विराट कोहली संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरूद्धच्या टी२० मालिकेसाठी संघ निवडण्यात आला. या संघात विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या बड्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. तरीही विश्वचषक स्पर्धेच्या उपविजेत्या संघाला भारताने धूळ चारल्यामुळे पाकिस्तानचा एक खेळाडू चांगलाच खुश झाला.

हेही वाचा: IND vs NZ: 'हिटमॅन'चा किंग कोहलीच्या 'विराट' विक्रमावर डोळा

Team India

Team India

"नव्या दमाच्या खेळाडूंना संघात स्थान देत भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळलेल्या न्यूझीलंडवर मालिका विजय मिळवला. इतर कोणत्याही संघाला असा पराक्रम शक्य झाला नाही पण भारताकडे खूप चांगले खेळाडू आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा विचार करून त्यांनी अनेक खेळाडूंना आराम दिला आहे. वर्कलोड मॅनेजमेंटच्या (शारीरिक आणि मानसिक ताण) बाबतीत भारताच्या निवड समितीने खूपच चांगले काम केले आहे", अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचा क्रिकेटपटू कमरान अकमल याने दिली.

हेही वाचा: IND vs NZ: भुवीला बसवा अन् 'या' खेळाडूला संघात घ्या- गंभीर

दरम्यान, न्यूझीलंड विरूद्धच्या शेवटच्या सामन्यासाठी भारतीय संघाने दोन बदल केले. डावखुरा फलंदाज इशान किशन याला सलामीवीर म्हणून संघात स्थान देण्यात आले. त्याच्या जागी लोकेश राहुलला विश्रांती दिली गेली. तसेच, अनुभवी रविचंद्रन अश्विनलाही विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली.

loading image
go to top