esakal | BCCIच्या 'त्या' खास निर्णयावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर फिदा
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

BCCIच्या 'त्या' खास निर्णयावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर फिदा

sakal_logo
By
विराज भागवत

आपल्या यू-ट्युब चॅनेलवरील व्हिडीओमध्ये व्यक्त केलं मत

T20 World Cup 2021: भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेत चार सामन्यांनंतर टीम इंडिया २-१ने पुढे आहे. पण, भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि ज्युनियर फिजीओ योगेश यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कसोटी मालिकेतील पाचवा सामना अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे. चौथ्या सामन्यानंतर BCCI च्या निवड समितीने T20 World Cup 2021 साठी भारताचा संघ जाहीर केला. या संघासोबत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला संघाचा मार्गदर्शक (Mentor) म्हणून समाविष्ट करण्यात आले. BCCIच्या या निर्णयाचे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटून तोंडभरून कौतुक केले.

हेही वाचा: 'टीम इंडिया'चा मेंटॉर होताच धोनीविरोधात तक्रार; वाचा सविस्तर

आपल्या यू ट्यूब चॅनेलवरून पाकचा माजी कर्णधार सलमान भट याने आपले मत मांडले. "महेंद्रसिंग धोनी हा एक अप्रतिम प्रतिभेचा खेळाडू आहे. त्याने अनेक दडपणाच्या प्रसंगांना तोंड दिलं आहे. इतकंच नव्हे तर आपल्या संघाला अनेक करंडक आणि चषके मिळवून दिली आहेत. त्यामुळे भारताचा मेंटर म्हणून त्याला संघासोबत समाविष्ट करण्याचा BCCIचा निर्णय म्हणजे मास्टरस्ट्रोकच म्हणायला हवा. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने दोन विश्वचषक जिंकले आहेत. जेव्हा संघ अडचणीच्या स्थितीत असतो, तेव्हा असे माजी खेळाडू संघाला मदत करतात. त्यामुळे धोनीला मेंटर करण्याचा निर्णय हा खरंच मास्टरस्ट्रोक आहे", असे स्पष्ट मत सलमान बट याने व्यक्त केले.

हेही वाचा: T20 World Cup: चहलला का वगळलं? निवड समितीने सांगितलं कारण

MS-Dhoni

MS-Dhoni

दरम्यान, धोनीची मेंचरपदी करण्यात आलेली निवड चुकीची असून BCCI च्या नियमावलीचा हा भंग आहे, अशी तक्रार करण्यात आली आहे. लोढा समितीच्या शिफारशींनुसार, एक व्यक्ती दोन पदे एकाच वेळी भूषवू शकत नाही. महेंद्रसिंग धोनी हा सध्या IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार म्हणून खेळत आहे. त्याचसोबत त्याला टीम इंडियाचा मेंटॉर म्हणूनही निवडण्यात आले आहे. ही बाब लोढा समितीच्या शिफारशींनुसार योग्य नाही, अशी तक्रार मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे माजी आजीव सभासद संजीव गुप्ता यांनी केली आहे. या आधीही त्यांनी लोढा समितीच्या शिफारशींचा आधार घेत अनेक वेळा लाभाच्या पदांबाबतच्या विविध खेळाडूंच्या तक्रारी केल्या आहेत. धोनीच्या बाबतीत एकाच वेळी दोन ठिकाणी पदे भूषवणे म्हणजे लाभाच्या पदाच्या कलमाचे उल्लंघन ठरेल, अशी तक्रार गुप्ता यांनी केली आहे.

loading image
go to top