Pakistani Kabaddi Player Wears India Jersey
esaka
Pakistani Kabaddi Player: पाकिस्तानचा कबड्डीपटू उबैदुल्लाह राजपूत भारतीय संघाची जर्सी घालून एका स्पर्धेत खेळला होता. त्याचे फोटो आणि व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, आता त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. उबैदुल्लाह राजपूतदेखील मोठ्या अडचणीत सापडला आहे. या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये संताप व्यक्त केला जात असून पाकिस्तान फेडरेशन आता त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शक्यता आहे.