esakal | VIDEO : दुबळ्या झिम्बाब्वेसमोर बाबरने टेकले गुडघे
sakal

बोलून बातमी शोधा

Babar Azam

VIDEO : दुबळ्या झिम्बाब्वेसमोर बाबरने टेकले गुडघे

sakal_logo
By
सुशांत जाधव

Zimbabwe vs Pakistan Test Series 2021: झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सपशेल फ्लॉप ठरलाय. आतापर्यंतच्या दोन कसोटी सामन्यात बाबरला दोन डावात बॅटिंग मिळाली. पहिल्या कसोटी सामन्यात बाबरला खातेही उघडता आले नव्हते. दुसऱ्या कसोटी सामन्यात ब्लेसिंग मुजारबानी याने त्याला स्वस्तात तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या कसोटी सामन्यात बाबर आझमला संघाच्या धावसंख्येत केवळ 2 धावांची भर घालता आली. गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत तुलना होत असलेला बाबर आझमला सोशल मीडियावर आता ट्रोल करण्यात येत आहे. दुबळ्या झिम्बाब्वेविरुद्ध त्याच्या पदरी आलेली निराशा सर्वांनाच आश्चर्यचकित करुन सोडणारी आहे.

हेही वाचा: 46 वर्षानंतर पारसी क्रिकेटरला मिळाली टीम इंडियात संधी

बाबर आझमने आतापर्यंत खेळलेल्या 33 कसोटी सामन्यात 42.52 च्या सरासरीने 2169 धावा केल्या आहेत. यात 5 शतकांचा समावेश आहे. बांगलादेश विरुद्ध घरच्या मैदानावर खेळताना त्याने शेवटचे कसोटी शतक झळकावले होते. रावळपिंडीतील मैदानात लगावलेल्या शतकानंतर 12 डावात त्याच्या भात्यातून शतक निघलेले नाही. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरनेही त्याच्या निराशजनक कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे.

हेही वाचा: ... म्हणून हार्दिक पांड्याला टीम इंडियातून डच्चू

अख्तरने PTV ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाबरच्या कामगिरीवर भाष्य केले. बॅटिंगसाठी प्रतिक्षा करावी लागत असल्यामुळे त्याचा फोकस कमी झालाय, असे शोएब अख्तरने म्हटले आहे. पाकिस्तानी संघाचे सलामीवीर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे बाबरला बराच वेळ पॅव्हेलियनमध्ये बसून रहावे लागते. आपल्यावर नंबर येईपर्यंत प्रतिक्षा करणे कठीण असते. झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी सामन्यात बाबर आझमच्या भात्यातून धावांची बरसात होणे अपेक्षित होते. या मालिकेत त्याच्याकडून 300-400 धावा व्हायला हव्या होत्या. खराब फॉर्ममधून तो दमदार कमबॅक करेल, असा विश्वासही अख्तरने व्यक्त केलाय.