India Vs Pakistan : पाकिस्तान भारतात वर्ल्डकप खेळण्यासाठी... विदेश मंत्र्यांनी PCB चेअरमन सेठींनाच पाडले तोंडघाशी

India Vs Pakistan
India Vs Pakistan

India Vs Pakistan World Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन नजम सेठी हे अनेक दिवसांपासून भारतीय संघ आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानात आला नाही तर पाकिस्तानही भारतात होणाऱ्या वनडे वर्लड्कपसाठी पाकिस्तानचा संघ पाठवणार नाही अशी धमकी देत होते. या धमकीची हवा खुद्द पाकिस्तानचे विदेशमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी काढून टाकली. बिलावल भुट्टो झरदारी हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत.

India Vs Pakistan
KL Rahul Injury : केएल राहुल आयपीएलच नाही तर WTC Final ला देखील मुकणार, सूर्यकुमारचे नशीब पुन्हा उघडणार?

पाकिस्तानचे विदेशमंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायजेशन (SCO) च्या बैठकीसाठी भारत दौऱ्यावर आले आहेत. ते जवळपास 12 वर्षानंतर भारत दौरा करणारे पाकिस्तानचे पहिले विदेश मंत्री आहेत. बिलावल भुट्टो यांना यावेळी पाकिस्तानचा संघ वनडे वर्ल्डकपसाठी भारत दौऱ्यावर पाठवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, 'आशा आहे की आपण अशा परिस्थितीत नाही आहोत की तिथे खेळात बाधा येईल.' बिलावल भुट्टो यांचे हे वक्तव्य रॉयटर्सने प्रसिद्ध केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com