
'कॉफी विथ करण' या टीव्ही कार्यक्रमात महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आलेल्या बंदीमुळे एक मोठा धक्का बसला.
नवी दिल्ली : 'कॉफी विथ करण' या टीव्ही कार्यक्रमात महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आलेल्या बंदीमुळे एक मोठा धक्का बसला. अस्तित्वाची जाणीव झाली तसेच विचार करण्याचा दृष्टिकोनही बदलला, अशी कबुली भारतीय क्रिकेट संघाचा हुकमी फलंदाज के. एल. राहुलने दिली आहे.
वाचा ः लोकल सुरु होणार का? मध्य रेल्वेने दिली महत्वाची माहिती...
'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात हार्दिक पंड्या आणि राहुल यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलवण्यात आले. तसेच चौकशी होईपर्यंत बंदीही घालण्यात आली होती. या प्रकरणामुळे या दोघांची बदनामीही झाली होती. 2019 मधील या प्रकरणाने चांगलाच धडा शिकवला होता. त्यानंतर विचार करण्याची माझी दिशाच बदलली. अहंकार, फाजिल आत्मविश्वास सर्व काही मी बाजूला सारले आणि संघासाठी आपल्याला काय करता येईल, याचा विचार करू लागलो, असे राहुलने सांगितले.
वाचा ः सुशांतच्या आत्महत्येच्या केवळ तीन तासांपूर्वी अंकिता लोखंडेनं ठेवलं होतं 'हे' स्टेटस...
बंदीनंतर पुनरागमन केल्यानंतर राहुलच्या खेळात कमालीचा बदल झाला. फलंदाजीत तर त्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याएवढीच कमाल करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर यष्टिरक्षणाचीही जबाबदारी स्वीकारली. क्रिकेटपटूची कारकीर्द किती कमी असू शकते, याची मला बंदीमुळे जाणीव झाली. त्यामुळे मी योग्य पद्धतीने आपल्याला कशी प्रगती करता येईल, याचा विचार सुरू केला. आयुष्यात आपण पुढे जाऊन जेवढी वर्षे खेळता येईल, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचा. एक चांगला संघसहकारी म्हणून संघात स्थान मिळवायचे, अशा विचाराने मी मला बदलले, असे राहुल म्हणाला.