Oscar Pistorius : व्हॅलेंटाईन डेलाच गर्लफ्रेंडची हत्या करणारा 'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरिअस जेलमधून सुटणार

Oscar Pistorius
Oscar Pistoriusesakal

Oscar Pistorius : दक्षिण अफ्रिकेचा प्रसिद्ध माजी पॅरालंम्पिक खेळाडू ऑस्कर पिस्टोरियसला 2014 मध्ये गर्लफ्रेंड रीवा स्टीनकॅम्पची हत्या केल्याप्रकरणी जेल झाली होती. हा स्टार खेळाडू आता जेलमधून सुटणार आहे. 5 जानेवारी 2024 पासून त्याला परोल मंजूर झाला आहे. ब्लेड रनर या नावाने देखील ओळखला जाणाऱ्या ऑस्करने 2013 मध्ये त्याची गर्लफ्रेंड रीवाची हत्या केली होती.

Oscar Pistorius
IPL 2024 Auction : पंजाब किंग्ज 18.50 कोटी रूपयांच्या खेळाडूला करणार रिलीज; कमिन्स, रचिन रविंद्रवर असणार सर्वांच लक्ष?

डिपार्टमेंट ऑफ कोरिअॅक्शनल सर्विसने शुक्रवारी सांगितले की, 'डिपार्टमेंट ऑफ कोरेक्शनल सर्विसेस (DCS) ने ऑस्कर पिस्टोरियसचा 5 जानेवारी 2024 पासून परोल मंजूर केला आहे.'

ऑस्कर पिस्टोरियसने दावा केल्याप्रमाणे त्याने गर्लफ्रेंड रीवाला चोर समजून गोळ्या झाडल्या होत्या. मात्र सुनावणीदरम्यान समोर आलेल्या अनेक रिपोर्ट्सनुसार रीवा ही ऑस्करसोबत रात्री उशिरा झालेल्या भांडणानंतर बाथरूमकडे पळाली होती. ऑस्करने तिचा रागाच्या भरात खून केला.

Oscar Pistorius
WPL 2024 Auction : वुमन्स प्रीमियर लीगच्या लिलावाची तारीख ठरली, फ्रेंचायजींच्या सॅलरी पर्समध्ये मोठी वाढ?

सुरूवातीच्या काळात ऑस्कर पिस्टोरियसला सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. मात्र अनेकवेळा त्याची केस पुन्हा तपासल्यानंतर त्याची शिक्षा वाढवून 13 वर्षे करण्यात आली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com