esakal | भालाफेकचा गोल्डन दिवस; नवदीपची मॅच पाहण्यासाठी गावात LED स्क्रीन
sakal

बोलून बातमी शोधा

athlete javelin thrower navdeep

भालाफेकचा गोल्डन दिवस; नवदीपची मॅच पाहण्यासाठी गावात LED स्क्रीन

sakal_logo
By
सुशांत जाधव

Paralympics 2020 : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने गोल्डन कामगिरी करुन दाखवली. त्यानंतर आता पॅरालिंपिक स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू सोनेरी पथावर दिमाखात चालताना दिसताहेत. महिला नेमबाज अवनी लेखाराने देशासाठी पहिले सुवर्ण पटकावल्यानंतर भालाफेकमध्ये इंडियाला आणखी एक गोल्डन बॉय मिळाला. सुमित अंतीलने F 64 क्रीडा प्रकारात नवा विश्वविक्रम प्रस्थापित करत गोल्डन कामगिरी करुन दाखवली. नेमबाजीत मनिष नरवालने भारताच्या खात्यात तिसरे गोल्ड जमा केले. यांच्याच पावलावर पाउल ठेवत नवदीपही गोल्डन दिशेनं वाटचाल करत आहे.

नवदीपने देशासाठी गोल्डन कामगिरी करावी यासाठी त्याच्या घरी दीप प्रज्वलित करुन प्रार्थना करण्यात येत आहे. एवढेच नाही तर त्याचा सामना पाहण्यासाठी गावात LED स्क्रीन लावण्यात आलीये. जपानच्या टोकियोत पुन्हा एकदा जण गण मन ची आवाज ऐकायला मिळणार अशी आशा नवदीपच्या गाववल्यांना आहे.

हेही वाचा: Paralympics : मनिष नरवालचा सुवर्ण वेध; सिंहराजलाही रौप्य

पानीपतमधील बुआना लाखु निवासी नवदीप F-41 क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधीत्व करत आहे. आपल्या गटात वर्ल्ड रेकॉर्डपासून तो अवघे 50 सेंटीमीटर दूर आहे. वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घालून तो गोल्डन कामगिरी करण्याच्या इराद्याने उत्सुक असेल. पॅरालिंपिकच्या तयारीसाठी दीड वर्षांपासून तो घरी परतलेला नाही. गोल्डन कामगिरी करुनच तो घरी परतेल, असा त्यांच्या कुटुंबियांचा विश्वास आहे.

हेही वाचा: IND vs ENG : टीम इंडिया पिछाडीवरुन धमाका करण्यात माहिर; पण...

नवदीपची कामगिरी

2010 मध्ये दुबई जागतिक ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप गोल्ड

ज्युनिअर आणि अंडर-20 पॅरा नॅशनल चॅम्पियनशिप 4 गोल्ड मेडल

2019 स्वित्झर्लंड पॅरा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप गोल्ड मेडल

2021 फ्रेब्रुवारी 43.78 मीटर भाला फेकत पॅरालिंपिकमधील रेकॉर्डपासून तो 50 सेंटीमीटर दूर

loading image
go to top