Arshad Nadeem's response to receiving a buffalo as a gift
Arshad Nadeem's response to receiving a buffalo as a giftSakal

Arshad Nadeem Viral Video: 'म्हशीऐवजी ५-६ एकर जमीनच दिली असती तर...', अर्शद नदीमने पत्नीसमोरच सासऱ्यांच्या गिफ्टची उडवली खिल्ली

Arshad Nadeem's Response to Receiving a Buffalo as a Gift: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमला त्याच्या सासऱ्यांनी म्हैस भेट दिली होती, यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

Javelin Throw Gold Winner Receives Buffalo as Gift Viral Video: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकीच्या स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक जिंकले. त्याने नवा ऑलिम्पिक विक्रम प्रस्थापित करत हे सुवर्णपदक मिळवले होते. पाकिस्तानचे हे ऍथलेटिक्समधील पहिलेच सुवर्णपदक ठरले.

त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्याचे सध्या पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. तो जेव्हा हे सुवर्ण पदक जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये परतला होता, तेव्हा त्याचे जंगी स्वागतही झाले होते. त्याच्यावर अनेकांनी बक्षीसाचा वर्षाव केला. त्याचे सासरे मुहम्मद नवाझ यांनी त्याला म्हैस भेट दिली आहे. त्यांच्या गावात म्हैस भेट देणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते.

दरम्यान, या भेटीबद्दल अर्शद नदीमने गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्याच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यात तो गमतीने म्हैसऐवजी ५-६ एकर जमीन द्यायला हवी असं म्हटलं होतं.

Arshad Nadeem's response to receiving a buffalo as a gift
Video Viral: मला साथ द्या... अर्शद नदीम पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत होता अन् बाजूने येत होता घोरण्याचा अवाज
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com