विराट भारी की बाबर? पॅट कमिनस पाकिस्तानातून बोलला... | Pat Cummins Statement Over Babar Azam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pat Cummins Statement Over Babar Azam Virat Kohli

विराट भारी की बाबर? पॅट कमिनस पाकिस्तानातून बोलला...

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Tour Of Pakistan) आहे. कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील 2 कसोटी सामने अनिर्णित राहिल्यानंतर तिसऱ्या लाहोर कसोटीसाठी तयारी करत आहे. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना पॅट कमिन्सने चेंडूला लाळ लावण्यावर बंदी, आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणे तसेच भारताचा विराट कोहली (Virat Kohli) भारी की पाकिस्तानचा बाबर आझम (Babar Azam) या सर्व प्रश्नावर दिलखुलास उत्तरे दिली.

हेही वाचा: तिने इतिहास पुन्हा लिहायला लावला! Shabaash Mithu चा टिझर रिलीज

कमिन्सने चेंडूला लाळ लावण्यावर कायमची बंदी (Saliva Ban) घालण्याबाबत आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, मला असे वाटत नाही की चेंडूला लाळ लावणे बॅन झाल्यावर मोठा फरक पडेल. माझ्या माहितीनुसार आजून आम्ही आमच्या घामाचा वापर करू शकतो. त्यामुळे ही मोठी गोष्ट नाही.' एमसीसीने चेंडू शाईन करायला लाळ लावणे हा गैरप्रकार असल्याचे मानले आहे. त्यांनी याच्यावर कायमची बंदी घालण्याची शिफारस देखील केली आहे.

दरम्यान, कमिन्सला आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) खेळण्याबाबत विचारले असता तो म्हणाला, 'मी खूप उत्साही आहे. केकेआर जास्तीजास्त खेळाडूंना पुन्हा संघात घेण्यात यशस्वी ठरले आहे. संघातील अनेक खेळाडू एकमेकांना चांगले ओळखतात.'

हेही वाचा: श्रेयसची चॉईसच निराळी; विराट-रोहित नाही तर 'हा' अपयशी कर्णधार आवडीचा

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 196 धावांची झुंजार खेळी केली. त्यानंतर कमिन्सला विराट कोहली आणि बाबर आझम यांच्यातील तुलनेविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी कमिन्सने 'दोन्ही फलंदाज हे परीपूर्ण फलंदाज आहेत. ते कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळले तरी ते तुमच्यासमोर आव्हान उभे करू शकतात. दोन्ही फलंदाज जबरदस्त आहेत. दोघांनीही ऑस्ट्रेलियाविरूद्ध अनेक वेळा शतके ठोकली आहे.' असे उत्तर दिले.

Web Title: Pat Cummins Statement Over Babar Azam Virat Kohli Comparison

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top