Pakistan Cricket : इंझमामचं पुनरागमन; PCB कडून मिळाली मोठी जबाबदारी

Pakistan Cricket
Pakistan Cricket esakal

नवी दिल्लीः पाकिस्तान क्रिकेट टीमचा एकेकाळचा दिग्गज खेळाडू इंझमाम-उल-हक याचं पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अशिया कप २०२३ आणि विश्वचषक २०२३ साठी त्याची चीफ सिलेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे.

आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कपसाठी निवडल्या जाणाऱ्या टीममध्ये इंझमामची महत्त्वाची भूमिका असणार आहे. पीसीबीने सोशल मीडियावर या निवडीची माहिती दिली. इंझमामने यापूर्वीदेखील चीफ सिलेक्टर म्हणून का केलेले आहे. २०१६ मध्ये त्याच्याकडे ही जबाबदारी होती.

Pakistan Cricket
धक्कादायक! प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या 80 महिला HIV पॉझिटिव्ह; 35 जणींनी दिला बाळाला जन्म

यापूर्वी इंझमाम-उल-हक अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा कोच होता. पाकिस्तान टीमसोबतचा त्याचा कार्यकाळ अत्यंत चांगला होता. २०१७ मध्ये पाकिस्तानने भारताला पराभूत करुन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. दुसरीकडे कोच मिकी आर्थर आणि ग्रांट ब्रॅडबर्नच्या पदांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Pakistan Cricket
अमित शाहांची भेट घेतल्याच्या चर्चेनंतर जयंत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'बाहेर येताच दिली प्रतिक्रिया...

आयसीसीने वर्ल्ड कप संघ निवडण्याची अंतिम तारीख २९ ऑगस्ट दिली आहे. इंझमामकडे या स्पर्धांचे संघ निवडण्यासाठी कमी वेळ आहे. आशिया कप 22 ऑगस्टपासून तर आयसीसी विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून भारतात खेळला जाणार आहे. आशिया कपचे सामने श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये होणार आहेत. श्रीलंकेत 9 सामने होणार आहेत तर पाकिस्तानमध्ये फक्त 4 सामने होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com