Mohammad Rizwan : पाकचं तंत्रज्ञानाचं रडगाणं... रिझवान प्रकरणी PCB करणार ICC कडे तक्रार

Mohammad Rizwan Controversy
Mohammad Rizwan Controversy esakal

Mohammad Rizwan Controversy : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज मोहम्मद रिझवान वादग्रस्तरित्या बाद झाला होता. आधी मैदानावरील पंचांनी रिझवानला नाबाद ठरवलं होतं. मात्र तिसऱ्या पंचांनी चेंडू रिस्ट बॅडला लागून गेल्याचं सांगत त्याला बाद ठरवलं होतं. यावर रिझवानने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

पॅट कमिन्सचा गोलंदाजीवर 35 धावा करून पाकिस्तानचा डाव सावरणारा मोहम्मद रिझवान बाद झाला होता. मैदनावरील पंचांना कमिन्सची अपिल फेटाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तिसऱ्या पंचांनी स्निकोमीटरचा वापर करत रिझवानला बाद ठरवलं.

Mohammad Rizwan Controversy
Gautam Gambhir : कायम वादग्रस्त वक्तव्य का करतोस...? चाहता थेट भिडला, गंभीरनेही दिलं सडेतोड उत्तर

मात्र पाकिस्तानी संघ या निर्णयावर नाराज दिसला. चेंडू हा रिझवानच्या मनटाच्या थोडाच वर होता. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पासीबी चेअरमन झाका अश्रफ यांनी क्रिकेट संचालक मोहम्मद हाफीजसोबत चर्चा केली असून मेलबर्नमध्ये पंचगिरी आणि ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर झाला हा मुद्दा ते आयसीसीत घेऊन जाणार आहेत.

रिझवानला बाद दिल्यानंतर हाफीज देखील नाराज झाला होता. सामना संपल्यानंतर त्याने पंचगिरीच्या बाबतीत सातत्याचा अभाव तंत्रज्ञानाचा कसोटीच्या निर्णयावर होणारा परिणाम हे मुद्दे अधोरेखित केले होते.

Mohammad Rizwan Controversy
Rohit Sharma : बुमराला साथच मिळाली नाही; ४०० धावा होण्याइतकी खेळपट्टी नव्हती - रोहित

हाफीज म्हणाला होता की, 'तुम्ही संपूर्ण सामना पाहिला तर पंचांच्या निर्णयात सातत्याचा अभाव होता. आम्ही नैसर्गिक प्रवृत्ती राखत खूप चांगलं क्रिकेट खेळलो. आपल्या सर्वांना खेळाचे बेसिक माहिती आहे.'

'मात्र मला वाटतं की आपण क्रिकेट खेळण्यापेक्षा तंत्रज्ञानावर जास्त फोकस करतोय. मला वाटतं की या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे.'

हाफीज पुढे म्हणाला की, 'मी खेळात तंत्रज्ञान वापण्याच्या विरूद्ध नाही. मात्र जर यामुळे शंका आणि गोंधळ निर्माण होत असले तर ते मान्य नाही. काही निर्णय हे समजण्यापलीकडचे होते. जर चेंडू स्टम्पला हिट करत असेल तर फलंदाज कायम बाद असतो. मला कळत नाही की अंपायर्स कॉल तिथे का आहे.'

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com