PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

Indian Women Cricket Team with PM Modi : बीसीसीआयला अधिकृत पत्रही मिळाले; विशेष विमानाने जगजेत्ता भारतीय महिला संघ दिल्लीत पोहचणार
Prime Minister Narendra Modi to host the World Cup-winning Indian Women’s Cricket Team for a celebratory breakfast meet in New Delhi.

Prime Minister Narendra Modi to host the World Cup-winning Indian Women’s Cricket Team for a celebratory breakfast meet in New Delhi.

esakal

Updated on

PM Modi to Celebrate World Cup Victory with Indian Women’s Cricket Team : भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वकप जिंकून संपूर्ण देशाची मान जगभरात उंचावली आहे. सर्वस्तरातून या विश्वविजेत्या संघावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एवढंच नाहीतर या महिला संघातील सर्वच खेळाडूंना भरघोस बक्षीसही मिळत आहेत. देशातही अतिशय आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान एक मोठी अपडेट समोर येत आहे.

आता या विश्वविजेत्या संघाती खेळाडूंची लवकरच पंतप्रधान मोदींसोबत भेट होणार आहे. प्राप्त माहितीनुसार ५ नोव्हेंबर रोजी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघातील या खेळाडूंसोबत पंतप्रधान मोदी ब्रेकफास्ट करण्याची शक्यता आहे.    

याशिवाय विश्वचषक जिंकलेला हा भारतीय संघ उद्या मुंबईवरून दिल्लीत दाखल होणार आहे. एका विशेष चार्टड प्लेनद्वारे या सर्व खेळाडू दिल्लीत पोहचणार आहेतबीसीसीआयला पंतप्रधान मोदी हे विश्वविजेत्या भारतीय संघाची भेट घेणार असल्याबाबत अधिकृत पत्र देखील प्राप्त झालेले आहे. मात्र, विजयी रॅलबाबत अद्यापतरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Prime Minister Narendra Modi to host the World Cup-winning Indian Women’s Cricket Team for a celebratory breakfast meet in New Delhi.
Harmanpreet Kaur Net Worth : भारताला पहिला महिला विश्वचषक जिंकून देणारी हरमनप्रीत कौर किती श्रीमंत आहे?

भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विश्वचषकावर आपलं नाव कोरल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्टकरूनही या विश्वविजयी संघाचं कौतुक करत, अभिनंदन केलं होतं. यानंतर आता हा संघ प्रत्यक्ष मोदींची भेट घेणार असल्याने, या भेटीत नेमक्या कशा गप्पा रंगतात याचीही सर्वांना उत्सुकता आहे.

Prime Minister Narendra Modi to host the World Cup-winning Indian Women’s Cricket Team for a celebratory breakfast meet in New Delhi.
Luxury toilet seat : बापरे!!! एका ‘टॉयलेट सीट’ची किंमत तब्बल ८८ कोटी रुपयांपेक्षाही जास्त

ऑस्ट्रेलिया इंग्लड, आणि न्यूझिलंड नंतर भारत हा जगातील चौथा देश बनला आहे, ज्याच्या महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आहे. तर आशिया खंडातील भारत हा ही कामगिरी करणारा पहिलाच देश ठरलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com