सचिनच्या निरोपाच्या सामन्यात १० विकेट घेतल्या, सामनावीर ठरूनही पुन्हा संधीच मिळाली नाही; आता तोच निवडणार संघ

Pragyan Ojha प्रज्ञान ओझानं खेळलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात १० विकेट घेत सामनावीर पुरस्कार पटकावला होता. तरीही त्यानंतर संघात त्याला संधी मिळाली नाही. आता त्याचीच निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलीय.
Pragyan Ojha’s Career

Pragyan Ojha’s Career

Esakal

Updated on: 

बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीपदी प्रज्ञान ओझाची निवड केलीय. १८ वनडे, ६ टी२० आणि २४ कसोटी सामने खेळलेल्या प्रज्ञान ओझाचा शेवटचा कसोटी सामना अविस्मरणीय असा होता. सचिन तेंडूलकरचा तो शेवटचा कसोटी सामना होता आणि विशेष म्हणजे या सामन्यात सामनावीरचा पुरस्कार प्रज्ञान ओझाला मिळाला होता. प्रज्ञान ओझानं १० विकेट घेतल्या. पण त्याची ही कामगिरी सचिनचा शेवटचा सामना म्हणून फारशी चर्चेत राहिली नाही. त्यानंतर पुढच्या सामन्यात त्याला संधीच मिळाली नाही आणि हाच त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com