'लवकर बरे व्हा!' PM मोदींकडून मिल्खा सिंग यांच्या तब्येतीची विचारपूस

'लवकर बरे व्हा!' PM मोदींकडून मिल्खा सिंग यांच्या तब्येतीची विचारपूस

नवी दिल्ली: भारताचे धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून काल गुरुवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे. आठवड्याभरापूर्वीच मिल्खा सिंग यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (Prime Minister Narendra Modi spoke to former Indian sprinter Milkha Singh & inquired about his health)

'लवकर बरे व्हा!' PM मोदींकडून मिल्खा सिंग यांच्या तब्येतीची विचारपूस
अनलॉकच्या गोंधळानंतर विजय वडेट्टीवारांची सावध प्रतिक्रिया

दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी धावपटू मिल्खा सिंग यांच्याशी बातचित केली आहे आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. पंतप्रधानांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. तसेच अशी आशा व्यक्त केली आहे की, ते लवकरच बरे होऊन टोकियो ऑलिम्पिकसाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंना प्रेरणा आणि आशीर्वाद देतील.

याआधी प्रकृतीत झाली होती सुधारणा

गेल्या आठवड्यात ICU मध्ये दाखल केल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. कोरोना झाल्यामुळे चंदीगड येथील आपल्या घरातच विलगीकरणात होते. मात्र, अचानक प्रकृती खालावल्यामुळे मोहालीमधील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. मात्र, काल गुरुवारी पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना चंदीगडच्या PGIMER येथील कोविड हॉस्पिटलमधील ICUतं दाखल करण्यात आलं आहे. त्यांना सध्या वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रा. अशोक कुमार यांनी ही माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com