Prithvi Shaw : मला मित्र बनवायला आवडत नाही... पृथ्वी शॉने कारकीर्द सावरण्यासाठी घेतला मोठा निर्णय

Prithvi Shaw County Cricket
Prithvi Shaw County Cricket esakal

Prithvi Shaw County Cricket : गेल्या काही महिन्यापासून पृथ्वी शॉ हा त्याच्या कामगिरीमुळे कमी अन् वादांमुळेच जास्त चर्चेत राहिला होता. मैदानाबाहेरच्या या प्रकरणांमुळे शॉच्या कारकिर्दीवर देखील परिणाम होत आहे.

त्याला वेस्ट इंडीज विरूद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघातून डच्चू मिळाला आहे. याचबरोबर त्याचा एशियन गेम्स 2023 साठी पाठवण्यात येणाऱ्या युवा संघात देखील स्थान मिळालेले नाही.

या सर्व घडामोडीनंतर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw News) अखेर नुकत्याच झालेल्या वादांबाबत आपलं मन मोकळं केलं. पृथ्वी शॉच्या मते तो कुठेही गेला तरी वाद काही त्याची पाठ सोडत नाहीत. 22 वर्षाचा पृथ्वी शॉ म्हणाला की, मला एकट्याला वेळ घालवायला आवडतो. माझे फार मित्र नाहीत.

Prithvi Shaw County Cricket
Jasprit Bumrah : 'आय एम कमिंग होम…!' बुमराह झाला भावूक, फिटनेसबाबत दिली मोठी अपडेट

पृथ्वी शॉ विस्डेन इंडिया आणि क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, 'लोकं माझ्याबद्दल बरंच काही बोलत आहेत. मात्र जे मला ओळखतात त्यांना मी कसा आहे हे माहिती आहे. माझे फार मित्र नाहीत. मला मित्र बनवायला आवडत नाही. या पिढीत हे असं होत आहे. तुम्ही तुमचे विचार कोणाशीही शेअर करू शकत नाही.' (Prithvi Shaw Controversy News)

पृथ्वी शॉने आपली कारकीर्द सावरण्यासाठी एक मोठा निर्णय घेला आहे. त्याने नॉर्थम्पटनशायरकडून काऊन्टी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉला इंग्लंडमध्ये खेळणे आवडते. तो इंग्लंडमध्ये वयाच्या 12 व्या वर्षापासून खेळतोय.

Prithvi Shaw County Cricket
WI vs IND 2nd Test: लाजिरवाण्या पराभवानंतर विडिंजमध्ये मोठा बदल! भारताला हरवण्यासाठी 'या' खेळाडूला दिली संधी

पृथ्वी शॉ म्हणाला, 'मी काऊन्टी क्रिकेटकडे (County Cricket) फक्त एक सामना म्हणून पाहत आहे. आम्ही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जसा सामना खेळतो तसंच हे देखील आहे. खूप काही मोठी गोष्ट नाही फक्त एक वेगळा अनुभव. त्यांच्याकडून खेळण्यासाठी आमंत्रण येणे ही खूप मोठी गोष्ट आहे.'

शॉ पुढे म्हणाला की, 'मला तिथे जाऊन त्यांच्यासाठी धावा करायच्या आहेत. त्यांची अपेक्षा तशीच आहे. सहाजिकच त्यांनी माझी कामगिरी पाहिली आहे. त्यामुळेच त्यांनी मला आमंत्रित केलं आहे. त्यांना माझ्याकडे काहीतरी क्षमता आहे असा विचार त्यांनी केला असावा. मला वाटतं की इंग्लंडमध्ये खेळताना मजा येईल.' (Cricket News In Marathi)

पृथ्वी शॉकडे भारताचा तिनही क्रिकेट फॉरमॅटमधील फलंदाज म्हणून पाहिलं जात होतं. त्याच्याकडून काहीतरी मोठं करण्याची अपेक्षा होती. मात्र मुंबईकर पृथ्वी शॉ आता भारतीय संघात (Team India) परतण्यासाठी जोर लावत आहे. त्याची बॅटच आता बोलेल अशी आपेक्षा आहे. काऊन्टी क्रिकेटमधील दमदार कामगिरी त्याच्यासाठी टीम इंडियाची दारं उघडणार का हे पहावं लागले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com