WI vs IND 2nd Test: लाजिरवाण्या पराभवानंतर विडिंजमध्ये मोठा बदल! भारताला हरवण्यासाठी 'या' खेळाडूला दिली संधी

WI vs IND 2nd Test
WI vs IND 2nd Testsakal
Updated on

West Indies Squad For IND vs WI 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 20 जुलैपासून त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळल्या जाणार आहे. या दुसऱ्या कसोटीसाठी वेस्ट इंडिजने आपला 13 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.

यजमान वेस्ट इंडिजला पहिल्या कसोटीत एक डाव आणि 141 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. आता जाणून घेऊया दुसऱ्या सामन्यासाठी वेस्ट इंडिजने संघात काय बदल केले आहेत.

WI vs IND 2nd Test
MS Dhoni Bike Collection : 'हे तर बाईक शोरूम...' धोनीचे कलेक्शन पाहून दिग्गज क्रिकेटर भांबावला, साक्षीने बनवला video

दुसऱ्या कसोटीसाठी वेस्ट इंडिजच्या संघात बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू रॅमन रेफरच्या जागी फिरकीपटू केविन सिनक्लेयरला संघाचा भाग बनवण्यात आले आहे. रॅमन रेफर पहिल्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. मात्र, दोन्ही डावात तो अपयशी ठरला.

केविन सिंक्लेअरने आतापर्यंत वेस्ट इंडिजकडून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्याने मार्च 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने 7 वनडे आणि 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 25.63 च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याने 37.50 च्या सरासरीने 4 विकेट्स घेतल्या आहेत.

WI vs IND 2nd Test
Asia Cup 2023: भारताचा नेपाळवर अपेक्षित विजय! 9 विकेट अन् 167 चेंडू राखून केला पराभव

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी वेस्ट इंडिजचा संघ - क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड (उप-कर्णधार), अलिक अथानेज, टॅगिनेरयन चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, केमार रोच, केविन सिंक्लेअर, जोमेल वॉरिकन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.