मुंबई - प्रो कबड्डी लीगमधील लढतींचा थरार आजपासून मुंबईत पाहायला मिळणार आहे. मुंबईतील एनएससीआयमधील डोम येथे ५ ते १० जानेवारीदरम्यान ११ लढतींचा धमाका रंगणार आहे. यू मुम्बा आपल्या चार लढती घरच्या मैदानावर खेळेल. चार वर्षांनंतर यू मुम्बाचा संघ घरच्या मैदानावर खेळताना दिसणार आहे.
यू मुम्बा यंदाच्या पर्वात दमदार कामगिरी केली असून आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांपैकी ५ मध्ये विजय मिळवण्यात त्यांना यश मिळाले आहे. यात सलग ४ विजयांचा समावेश आहे. रिंकू, पदार्पणवीर सोमबीर आणि उपकर्णधार महेंदर सिंग यांच्या भक्कम खेळामुळे यू मुम्बाची बचावफळी सक्षम आहे. इराणच्या १९ वर्षीय आमिरमोहम्मद जफरदानेश यानेही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सर्वाधिक ६४ गुणांची कमाई करून तो सर्वोत्तम चढाईपटू ठरला आहे.
कर्णधार सुरिंदर सिंगकडून होत असलेली अप्रतिम कामगिरी, चढाईपटू गुमान सिंग आणि प्रमुख अष्टपैलू विश्वंथ यांची शानदार कामगिरीचादेखील यू मुम्बाच्या यशात मोठा वाटा आहे.
पहिल्या दिवसातील लढती
पाटणा पायरेटस् - दबंग दिल्ली
यू मुम्बा - बंगळुरू बुल्स
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.