
Aslam Inamdar
Sakal
प्रो कबड्डीच्या ११ व्या हंगामात स्टार खेळाडू अस्लम इमानदारला दुखापतीमुळे मुकावे लागले होते. अस्मल पुणेरी पटलनचा केवळ महत्त्वाचा खेळाडूच नाही, तर प्रो कबड्डी विजेता कर्णधारही आहे. त्याच्या अनुपस्थितीत गेल्या हंगामात पुणेरी पटलनची फारशी चांगली झालेली नव्हती.
मात्र १२ व्या हंगामात पुणेरी पलटन पुन्हा नव्या जोशात उतरले असून अस्लमचेही पुनरागमन झाले आहे. संघातील अनेक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्येही आहे. त्यामुळे पुण्याने सातत्याने चांगली कामगिरी केली असून पहिल्या दोन क्रमांकामध्ये ते राहिले आहेत. यातील अनेक मुद्द्यांवर त्याने जिओस्टारच्या मिडिया डे मध्ये बोलताना भाष्य केले.