स्वतःचे कोपर स्वतःच फिक्स करणारा रोहित आहे डॉक्टर; सोशलवर एकच चर्चा

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा डॉक्टर असल्याची चर्चा रंगली आहे.
rohit sharma orthopedic surgen
rohit sharma orthopedic surgen esakal
Updated on

लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 100 धावांनी दारुण पराभव केला. रीस टॉपली इंग्लंडच्या विजयाचा नायक ठरला. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने भारताचं कंबरड मोडलं. दरम्यान या सामन्यानंतर सोशल मीडियावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा डॉक्टर असल्याची चर्चा रंगली आहे. इतकेच नव्हे तर त्याच्याकडे डिग्री असल्याचेही म्हटले जात आहे.(Rohit Sharma orthopedic surgen)

rohit sharma orthopedic surgen
ENG vs IND : विराट कोहलीसाठी इंग्लंडचा कर्णधार बटलर पत्रकाराला भिडला

दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडच्या डावात फिल्डींग करताना रोहित शर्माचा खांदा निखळला. त्यानंतर फिजिओला मैदानावर बोलवण्याऐवजी रोहित शर्माने स्वत: खांदा रिलोकेट केला. हे पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर तो ऑर्थोपेडिक सर्जन असल्याच्या चर्चेला उधाण आलं.

सोशल मीडियावर एक फोटो असा व्हायरल होतोय, ज्यामध्ये डॉ. रोहित शर्मा असं इंटरनेटवर सर्च केल जात आहे. तर एका युजरने "लोकांनी रोहितला पाहून आश्चर्यचकीत होऊ नये, कारण तो स्वतःच ऑर्थोपेडिक आहे." असं म्हटलं आहे.

ज्यावेळी मैदानावर हा प्रसंग घडला तेव्हा भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर आणि विवेक राजदान कॉमेंट्री करत होते. यावेळी दोघंही गमतीने म्हणाले की, रोहित शर्माला पाहून फिजिओ घाबरला असावा. कारण त्यासा आपली नोकरी धोक्यात आली, असं वाटलं असेल.

rohit sharma orthopedic surgen
Virat Kohli : 'ही वेळ देखील निघून जाईल' बाबर आझमची भावनिक पोस्ट

तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने आधी 1-0 अशी आघाडी घेतली होती. इंग्लंडने आता 1-1 अशी बरोबरी साधली आहे. रविवारी होणारा तिसरा एकदिवसीय सामना निर्णायक ठरेल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव 49 षटकात 246 धावांवर आटोपला. भारताचा डाव 146 धावांवर संपुष्टात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com