आर. अश्विनची कोरोनावर मात; इंग्लंड दौऱ्यावरील संघात दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

R Ashwin Recovering From COVID 19 Join Team India In England

आर. अश्विनची कोरोनावर मात; इंग्लंड दौऱ्यावरील संघात दाखल

नवी दिल्ली : भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने कोरोनावर मात केली असून तो इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय कसोटी संघात दाखल झाला आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये 1 जुलैपासून एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. ज्यावेळी संपूर्ण संघ इंग्लंडसाठी रवाना झाला त्यावेळी त्या संघासोबत आर. अश्विन नव्हता. त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो संघासोबत जाऊ शकला नव्हता. भारतीय संघ 16 जूनला इंग्लंडसाठी रवाना झाला होता. (R Ashwin Recovering From COVID 19 Join Team India In England)

हेही वाचा: VIDEO : बुमराहचा बॉल नको त्या ठिकाणी लागला अन् रोहित खालीच बसला

दरम्यान, विलगीकरणात असलेला आर. अश्विन लिसेस्टरमध्ये सुरू असलेल्या सराव सामन्यावेळी संघासोबत दिसला. दरम्यान, सूत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'होय अश्विन टीम इंडिया सोबत जोडला गेला आहे. मात्र तो अजूनही आजारपणातून सावरत आहे. त्यामुळे तो सराव सामन्यात खेळू शकलेला नाही.'

भारतीय संघ व्यवस्थापनाला आशा आहे की तो इंग्लंड विरूद्धच्या 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी फिट होईल. आयपीएलनंतर अश्विन तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत खेळला होता. त्यावेळी त्याने 20 षटके टाकली होती. त्यामुळे त्याचा कसोटीसाठीचा सराव बऱ्यापैकी झाला आहे.

हेही वाचा: रोहितने आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेअर केले 'खास' पत्र

दरम्यान, सराव सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. शुभमन गिल 21 धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा देखील 25 धावांची भर घालून माघारी गेला. त्याला रोमन वॉकरने बाद केले. रोमनने हनुमा विहारीला देखील 3 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता धरायला लावला. तर प्रसिद्ध कृष्णाने श्रेयस अय्यरला भोपळा देखील फोडू दिला नाही. रोमनने 13 धावांवर जडेजाला बाद करत भारताला 81 धावांवर पाचवा धक्का दिला.

पावसाच्या व्यत्यसामुळे खेळ काही काळ थांबला होता. मात्र त्यानंतर विराट कोहलीने श्रीकार भरतच्या साथीने डाव सावरत संघाला शतक पार करून दिले. मात्र पुन्हा एकदा पावसाच्या व्यत्यामुळे खेळ थांबला. खेळ थांबला त्यावेळी भारताच्या 5 बाद 133 धावा झाल्या होत्या. विराट कोहली 32 तर भरत 11 धावा करून नाबाद होते.

Web Title: R Ashwin Recovering From Covid 19 Join Team India In England

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top