

Rahi Sarnobat Facing Hotel Chaos | Asian Games 2026
Sakal
Asian Games Hotel Booking Fiasco: जपानमध्ये सध्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ स्पर्धा खेळवल्या जात आहे. या स्पर्धेत भारतासह सहा देशांच्या ध्वजारोहणाचा सोहळा शुक्रवारी (ता. १८) तासभराच्या विलंबानंतर पार पडला. दरम्यान, ही स्पर्धा सुरू झाल्यापासूनच अनेक बाबतीत गोंधळ होत आहे.
खेळाडूंच्या राहण्याच्या व्यवस्थेमुळेही सध्या बराच गोंधळ झालेला दिसत असून यात भारतीय नेमबाजांनाही याचा फटका बसला आहे. या नेमबाजांमध्ये महाराष्ट्राची राही सरनोबत (Rahi Sarnobat) देखील आहे.