Rahul Dravid On Ishan Kishan : आम्ही संपर्कात! राहुलनं इशानबाबत दिली मोठी अपडेट; रोहितसह इतर फलंदाज रणजी खेळणार?

India Vs England Rohit Sharma Ajit Agarkar : तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघातील खेळाडू खेळणार रणजी ट्रॉफी
Rahul Dravid On Ishan Kishan
Rahul Dravid On Ishan Kishanesakal

Rahul Dravid On Ishan Kishan : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यातील पहिले दोन सामने झाले आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंडने 28 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या कसोटीत भारताने दमदार पुनरागमन करत इंग्लंडला 106 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1 - 1 अशी बरोबरी केली. भारताने जरी दुसरा कसोटी सामना जिंकला असला तरी त्यात अनेक खेळाडूंची कामगिरी लौकिकास साजेशी झालेली नाही.

भारताने या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीच आपला संघ जाहीर केला होता. आता पुढच्या तीन कसोटीसाठी निवसमिती एक दोन दिवसात संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, दुसरा कसोटी सामना झाल्यानंतर रोहित शर्मा आणि निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्यात दीर्घ चर्चा झाली. याचबरोबर राहुल द्रविडने देखील इशान किशनवर मोठी अपडेट दिली.

Rahul Dravid On Ishan Kishan
Ind vs Eng : द्विशतक ठोकणाऱ्या यशस्वी जैस्वालला नाही तर 'या' खेळाडूला मिळाला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार राहुल द्रविड सामना झाल्यानंतर बोलताना म्हणला की, 'इशान किशनने पुन्हा क्रिकेट खेळायला सुरूवात करणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्याचा संघ निवडीसाठी विचार करण्यात येईल. आम्ही त्याच्या संपर्कात आहोत.'

पहिल्या दोन कसोटीत श्रीकार भरतने भारतासाठी विकेटकिपिंग केली. मात्र त्याची फलंदाजीतील कामगिरी सुमारच होती. पहिल्या कसोटीतील 41 धावांची खेळी सोडली तर त्याला प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे पुढच्या कसोटीत त्याच्यावर संघातून वगळण्याची टांगती तलवार असणार आहे.

दरम्यान, सामना झाल्यावर कर्णधार रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांच्यात देखील दीर्घ चर्चा झाल्याचे समजते. भारतीय संघातील अनेक खेळाडू हे दुखापतग्रस्त आहेत. विराट कोहली देखील तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. याच पार्श्वभूमीवर निवडसमितीला आठवड्याभरात भारतीय संघाची घोषणा करणे गरजेचे आहे.

Rahul Dravid On Ishan Kishan
Ind vs Eng : दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पराभव करताच रोहित शर्माने मोडला धोनीचा 'हा' मोठा विक्रम, आता फक्त...

रणजी ट्रॉफी की ब्रेक?

सध्याच्या कसोटी संघातील खेळाडू श्रेयस अय्यर आणि केएस भरत यांनी सुमार कामगिरी केली आहे. दुसऱ्या कसोटीत विराट कोहली आणि केएल राहुल अनुपस्थित होते त्यामुळे या दोघांची संघात वर्णी लागली.

दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत 9 दिवसाचा गॅप आहे. याचदरम्यान 9 फेब्रुवारीला रणजी ट्रॉफीचा सामना होणार आहे. हा सामना 12 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे निवडसमिती संघातील काही खेळाडूंना हा सामना खेळण्यास सांगू शकते.

रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएस भरत आणि रजत पाटीदारसाठी हा रणजी सामना सरावाची एक उत्तम संधी ठरू शकतो. दुसरीकडे पाहुणा इंग्लंड संघ अबूधाबीत परतणार असून तिसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडचा संघ अबूधाबीतच सराव करेल.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com