Asia Cup 2023 : रमीझ राजाचा हट्टीपणा! पाकिस्तानच्या बाहेर आशिया कप..., भारताला पुन्हा धमकी

पाकिस्तानने पुन्हा एकदा आशिया कप 2023 बाबत आपला राग व्यक्त केला
Ramiz Raja Pakistan Asia Cup 2023
Ramiz Raja Pakistan Asia Cup 2023 sakal

Ramiz Raja Pakistan Asia Cup 2023 : पाकिस्तानने पुन्हा एकदा आशिया कप 2023 बाबत आपला राग व्यक्त केला आहे. आशिया चषक पाकिस्तानच्या बाहेर हलवल्यास त्यांचा संघ या स्पर्धेत सहभागी होणार नाही, अशी धमकी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली आहे. यापूर्वी पीसीबीने वनडे वर्ल्ड कपमधून माघार घेण्याची धमकी दिली होती. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर आशिया कप 2023 पाकिस्तानच्या बाहेर हलवला जाऊ शकतो. त्यामुळेच पीसीबीकडून वारंवार संतापजनक वक्तव्ये येत आहेत.

Ramiz Raja Pakistan Asia Cup 2023
FIFA WC22 : कॅमेरूनने रचला इतिहास! बलाढ्य ब्राझीलला पराभूत करण्याची केली किमया

क्रिकइन्फोच्या बातमीनुसार, रमीझने पाकिस्तान-इंग्लंड कसोटी सामन्याच्या पार्श्‍वभूमीवर सांगितले की, 'जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आला नाही तर आम्हीही तिथे जाणार नाही. जर आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावले गेले तर आम्ही ते सोडण्याचा विचार करू.' रमीझने यापूर्वी वनडे विश्वचषकातून माघार घेण्याची धमकी दिली होती.

मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांनुसार, आशिया कप 2023 चे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावले जाऊ शकते. ही स्पर्धा पाकिस्तानबाहेर आयोजित करण्याचा विचार सुरू आहे. मात्र याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

Ramiz Raja Pakistan Asia Cup 2023
FIFA WC22 : पराभवानंतरही पोर्तुगालने उपउपांत्यपूर्व फेरीत मारली धडक!

राजकीय तणावामुळे 2012 नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. त्याचबरोबर टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये जाऊन जवळपास 14 वर्षे झाली आहेत. 2008 मध्ये भारतीय संघ शेवटच्या वेळी पाकिस्तानला गेला होता. त्यामुळे दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये तणावाचे वातावरण आहे. याबाबत रमीझ राजा म्हणाले की, आमची भूमिका स्पष्ट आहे. जर टीम इंडिया पाकिस्तानात आले तरच आम्ही विश्वचषक खेळायला जाऊ. तसे झाले नाही तर विश्वचषक पाकिस्तानशिवाय खेळावा लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com